murder esakal
नाशिक

Nashik Crime News : वणी बसस्थानक परीसरात अज्ञात युवकाचा खून

सकाळ वृत्तसेवा

वणी (जि. नाशिक) : वणी बसस्थानकात डोक्यात व अंगावर दगड टाकून अनोळखी तरुणाचा अज्ञातांनी खुन केल्याची घटना घडल्याने वणी परिसरात खळबळ उडाली आहे. (Murder of unknown youth in Vani bus station area Nashik Crime news)

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, वणी बसस्थानकात आज रात्री एक ते चार वाजेच्या सुमारास एका अनोळखी तरुणाच्या अज्ञात आरोपींनी डोक्यावर व अंगावर दगड टाकुन मारले. यानंतर बसस्थानकाच्या स्वच्छतागृहाच्या बाजुला असलेल्या मोकळ्या जागेत काटेरी झाडांच्या बाजुला ओढत नेउन टाकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

घटनेनंतर बसस्थानाकातील वाहतूक नियंत्रक कार्यालयाचा दरवाजा व खिडकीचे गज वाकवून आतमध्ये प्रवेश करीत आपण केलेले कृत्य सीसीटीव्ही कैद झाला असावा म्हणून आरोपींनी सीसीटीव्ही यंत्रणेस लावलेले इन्वर्टर काढून नेले.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

मात्र डीव्हीआर तसाच राहील्याने घटनेचे रेकॉरडींग सदर डीव्हीआर मधून पोलिस हस्तगत करुन आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहे. दरम्यान पोलिसांनी श्वान व ठसे तज्ञ पथकास पाचारण करुन आरोपीचा माग काढण्याचा प्रयत्न केला असून घटनास्थळावर दगड व अन्य वस्तूंवरील ठसे पथकाने घेतली आहे.

यावेळी श्वानाने वाहतूक नियंत्रक कार्यालय ते मृतदेह पडलेले ठिकाण व व नदी बाजूकडे जावून परत वाहतूक नियंत्रक कार्यालय असा माघ काढला. घटनास्थळी पेठचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती फडताळे यांनी भेट देवून पाहाणी केली आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत, पोलिस उपनिरीक्षक प्रविण उदे आदीसंह पोलिस करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नावे चक्क पिवळं रेशनकार्ड, अज्ञातावर गुन्हा दाखल

Pune Metro Expansion : पुणे मेट्रोचा विस्तार २०० किलोमीटरवर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेट्रो भवनचे उद्‍घाटन

CM Devendra Fadnavis : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मे मध्ये धावणार; २३ किलोमीटरच्या मार्गिकेचे दोन टप्प्यांत उद्‍घाटन

Dharashiv Accident: तुळजापूर-लातूर महामार्गावर भीषण अपघात; तीन वाहनांची धडक, एक ठार

Latest Marathi Update : राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT