musandi movie director, producer with starcast esakal
नाशिक

Musandi Marathi Movie : ‘मुसंडी’ चित्रपट 9 जूनला चित्रपटगृहांत

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : एमपीएससी, यूपीएससी यांसारख्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून शासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून वर्षानुवर्षे अभ्यास करणाऱ्या तरुणांच्या जीवनावर आधारित ‘मुसंडी’ चित्रपट ९ जूनला प्रदर्शित होणार आहे. (Musandi movie in theaters on June 9 nashik news)

स्पर्धा परीक्षांमधील यशापयश परीक्षार्थींच्या जीवनावर दूरगामी परिणाम करणारे असते. या स्पर्धेमुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक प्रश्नांवर या चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.

‘मुसंडी’ चित्रपटाच्या सर्व कलाकारांनी शुक्रवारी (ता. १२) सातपूर येथील ‘सकाळ’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. या वेळी चित्रपटाविषयी गप्पा मारताना लेखक व निर्माते गोवर्धन दोलताडे म्हणाले, ‘मुसंडी’ चित्रपट प्रत्येकाला आपल्यातल्या आत्मविश्वासाची जाणीव करून देईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या चित्रपटातून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळेल, असा विश्वास चित्रपटाचे दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी व्यक्त केला. सोनाई फिल्म क्रिएशन प्रस्तुत या चित्रपटात रोहन पाटील आणि गायत्री जाधव ही जोडी प्रमुख भूमिकेत आहे.

या दोघांसोबत सुरेश विश्वकर्मा, शुभांगी लाटकर, तानाजी गळगुंडे, शिवाजी दोलताडे, गोलीगत ऊर्फ सूरज चव्हाण, अरबाज शेख, प्रणव रावराणे, अक्षय टाक, घनश्याम दरवडे (छोटा पुढारी), सनमीता धापटे, वैष्णवी शिंदे, माणिक काळे, सुजित मगर, मयूर झिंजे, ऋतुजा वावरे, विकास वरे, राधाकृष्ण कराळे, राम गायकवाड, अजित पवार, उत्कर्ष देशमुख, सार्थक वाईकर, आर्यन पवार, निमिषा सानप, रुचिता देशमुख, प्रियांका पवार, ऐश्वर्या फटांगरे, श्रद्धा गायकवाड, सोनाली गायकवाड, आकांक्षा कापे, प्राजक्ता गायकवाड, मानसी डरंगे, भाग्यश्री पवार यांच्या भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Mundhwa land Case: मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानीला अखेर अटक; अमेडिया कंपनीसोबत व्यवहार झाल्याचं उघड

Latest Marathi News Live Update : घाटकोपर मधील वसंत विहार बिल्डिंगमधील एका रूमला लागली आग

Sangli News : कडाक्याची थंडीही रोखू शकली नाही शिराळकरांना; दुपारपर्यंत तब्बल ६६.७३% मतदानाची नोंद

T20I World Cup 2026 साठी भारताच्या नव्या जर्सीचे झाले अनावरण; ब्रँड अँबेसिडर रोहित शर्माचीही उपस्थिती; पाहा Video

Horoscope Prediction : येत्या चार दिवसांमध्ये पालटणार 3 राशींचं नशीब ! शनी देवांच्या कृपेने घरात येणार पैसा

SCROLL FOR NEXT