नाशिक

म्युझिकल योगा ग्रुप कार्यक्रम

CD
धुळे टुडे २ साठी... --- फोटो-NSK26H33671 धुळे : म्युझिकल योगा ग्रुपतर्फे आयोजित गरबा स्पर्धेतील विजेत्यांच्या सन्मानप्रसंगी सन्मानार्थींसह ग्रुपचे सदस्य. --- म्युझिकल योगा ग्रुपतर्फे गरबा स्पर्धा विजेत्यांचा सन्मान --- सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २७ : म्युझिकल योगा ग्रुपतर्फे आयोजित गरबा स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून करण्यात आला. विजेत्यांना मानचिन्ह, मानवस्त्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. म्युझिकल योगा ग्रुपतर्फे विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येतात. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून नवरात्रोत्सवानिमित्त कालिका मंदिरासमोरील परिसरात योगाभ्यासानंतर नऊ दिवस उपस्थित सदस्यांनी एकत्रितपणे आई भगवतीच्या चरणी गरब्याच्या माध्यमातून भक्तिसेवा अर्पण केली. भक्ती आणि शक्ती यांचा सुरेख संगम साधत सकल विश्वाच्या शांतीसाठी आदिशक्तीची आराधना या उपक्रमातून करण्यात आली. या नऊ दिवसांत गरबा सादरीकरणातून उत्साह, समन्वय आणि भक्तिभाव व्यक्त करणाऱ्या स्पर्धकांचा विशेष सन्मान करण्यात आला. महिला गटातून सपना सोनवणे आणि पुरुष गटातून करण मारवाडी यांनी सातत्यपूर्ण व उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल त्यांना मानचिन्ह, मानवस्त्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमात प्रीत घुंडीयाल हिने आदिशक्तीचा आकर्षक वेश परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. स्पर्धेचे परीक्षण डॉ. रूपाली चित्ते यांनी केले. दरम्यान, कौजगिरी पौर्णिमेनिमित्त कार्यक्रमात दुग्ध प्रसाद वाटप करण्यात आला. या वेळी गुड मॉर्निंग म्युझिकल योगा ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prashant Kishor: प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या डिजिटल मीडिया प्रमुखांचा आढळला मृतदेह; चालत्या ट्रेनमधून झाले होते बेपत्ता

Water Crisis : हक्काचे पाणी उपसले; गावाला शासकीय टँकरची प्रतीक्षा! करजगावच्या पाझर तलावाने गाठला तळ

Latest Marathi News Live Update : पहिल्या फेरीत सेनेच्या किरण सरनाईक यांची आघाडी; काँग्रेसच्या अदिती पोहरे चौथ्या स्थानावर

Pakistan vs Sri Lanka: पाकिस्तानची घरच्या मैदानावर दाणादाण! श्रीलंकेने ११० धावांत गुंडाळलं, मदुशंकाचा पंजा अन् थेट फायनलमध्ये धडक

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण, ११ गोविंदांसह कॅमेरामनला जामीन; प्रमुख आरोपींच्या अर्जांवर सुनावणी बाकी

SCROLL FOR NEXT