crime sakal
नाशिक

नाशिक : मुस्लिम धर्मगुरूची हत्या, 'सुफी बाबा'चे अफगाणिस्तानशी संबंध; हल्लेखोर पसार

सकाळ डिजिटल टीम

चिचोंडी : चिचोंडी औद्योगिक परिसरात मंगळवारी सायंकाळी अफगाण नागरिक असलेल्या तरुणाची गोळ्या (Murder) झाडून खून केल्याची घटना घडली. घटनेनंतर चौघे अनोळखी व्यक्ती चारचाकी गाडी घेऊन पोबारा झाले. रात्री उशिरा फॉरेन्सिक लॅबतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले असून, उपलब्ध माहितीनुसार शहर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. खून झालेल्या युवकाबरोबर असलेले त्याचे मित्र गफार व आणखी एक (नाव माहीत नाही) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. (Muslim Spiritual Guru Murder )

चिचोंडी खुर्द (ता. येवला) येथील चिचोंडी-बदापूर रोडच्या लगत असलेल्या औद्योगिक वसाहत परिसरात मंगळवार (ता. ५) सायंकाळी सातच्या सुमारास अज्ञात व्यक्तीचा खून झाल्याची माहिती पोलिसपाटील वनिता सोमनाथ मढवई यांनी येवला शहर पोलिसांना दिली. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक भगवान मथुरे, सहाय्यक निरीक्षक नितीन खडांगळे, उपनिरीक्षक मनोहर मोरे यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी येत पंचनामा केला.

यावेळी अधिक चौकशीत अफगाण नागरिक असलेला सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिस्ती (अंदाजे वय ३६) या युवकास गोळी झाडून ठार करण्यात आल्याचे दिसून आले. तसेच घटनेनंतर चौघे अनोळखी व्यक्ती चारचाकी गाडी घेऊन पोबारा झाल्याचे समजले. दरम्यान, रात्री उशिरा नाशिक जिल्ह्याचे ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील, पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनी देखील तातडीने घटनास्थळी भेटून पाहणी केली.

रात्री उशिरा फॉरेन्सिक लॅबतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. उपलब्ध माहितीनुसार शहर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. दरम्यान, या अफगाणिस्तानी नागरिकाची चिचोंडी एमआयडीसी परिसरात हत्या का झाली? कशासाठी झाली? घटनास्थळी येथील एका भूखंडावर नारळ फोडून, अगरबत्ती लावून, कुंकू डबी मिळून आली. पूजेचा प्रकार कशासाठी करण्यात आला होता? या सर्व बाबींच्या अनुषंगाने तपास सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान खून झालेल्या व्यक्ती सोबत असलेले दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. खून झालेल्या व्यक्तीचे youtube ला हजारो फॉलोवर्स (227.k) असल्याचे घटनास्थळी समजले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Ashadhi Ekadashi : "बा विठ्ठला, राज्यातील प्रत्येक शेतकरी सुखी राहू दे..."; शासकीय महापूजेनंतर CM फडणवीसांचे पांडुरंगाला साकडे

Ashadhi Ekadashi Mahapuja : '20 वर्षे एकही वारी चुकवली नाही...'; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत शासकीय महापूजेचा कोणाला मिळाला मान? धाराशिवमधील शेतकरी दाम्पत्य आहे तरी कोण?

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : CM देवेंद्र-अमृता फडणवीसांच्या हस्ते विठूरायाची महापूजा; मुख्यमंत्र्यांनी काय मागितलं मागणं?

Pandharpur Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न; धाराशिवच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला 'मानाचा वारकरी' होण्याचा बहुमान

Pandharpur Ashadhi Wari : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे पार पडणार शासकीय महापूजा, 20 लाख भाविक दाखल

SCROLL FOR NEXT