Accidental truck. esakal
नाशिक

Nashik Crime: अपघाताचा बनाव करीत ट्रकमधील मालाची परस्पर विक्री; चालकाविरुद्ध गुन्हा

अपघाताचा बनाव करीत ट्रकमधील मालाची परस्पर विक्री केल्याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : ट्रकमध्ये भरलेल्या मालाची परस्पर विक्री करून मालट्रकचा अपघात झाल्याचे दाखवून वाहन ट्रकमधील लाखोंच्या मालाची परस्पर विक्री केल्याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Mutual sale of goods in trucks by faking an accident nashik crime news )

१५ डिसेंबर २०२३ रोजी गुजरात मधील एम.एस.घनश्‍याम इंडस्ट्रीज (ता.किशोद, जि.जुनागढ सोनदरडा) येथून ट्रक क्रमांक (एमएच २४ एयू ८८२९) या वाहनात शेंगदाणा माल (प्रत्येकी ५० किलोच्या ६२० गोणी, बाजारभाव नुसार ३३ लाख १० हजार ६६१ रुपये किमतीचा माल) महाराष्ट्रातील श्री सिद्धिविनायक कंपनीस पोचविण्यासाठी वाहनचालक बंडू सुरेश लोखंडे (रा.ब्रम्हपूरी, ता.मंगळवेढा जि.सोलापूर) हा मार्गस्थ झाला.

पेठ ते नाशिक मार्गावरील पेठ जवळील कोटंबी घाटात रात्री ८ ते ९ दरम्यान एका वळणावरुन ट्रक थेट २०० ते ३०० फुट दरीत कोसळल्याची खबर ट्रकचालक बंडू लोखंडे यांनी मालक आणि पेठ पोलिस ठाण्यात दिली आणि ट्रकसोडून निघून गेला.

याप्रकरणी पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करताना आजूबाजूला अत्यंत कमी प्रमाणात शेंगदाणे विखुरलेले दिसून आले. तर अपघाताचे स्थळ अरुंद दरीत असल्याने मालाची चोरी होण्याची शक्यता कमी होती.

याबाबत पोलिस आणि मालक मेनसीभाई मारखीभाई पिठीया यांना संशय आल्याने (रा.अंबावाडी, गुजरात) चालक लोखंडे यानेच मालाची परस्पर विल्हेवाट लावून अपघाताचा बनाव रचून अपहार केल्याचे सांगितले. यानंतर याप्रकरणी पोलिस ठाण्यात चालकाविरुद्ध तक्रार दाखल केली. श्री. पिठीया यांच्या तक्रारीवरून ट्रकचालक बंडू लोखंडे विरुद्ध ३१ हजार किलो शेंगदाण्याचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Reaction : ‘’मी जर पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर..’’ ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

IND vs ENG 2nd Test: बॅट निसटली, विकेट गेली! Rishabh Pant च्या आक्रमणाला ब्रेक, मोडला ५९ वर्षांपूर्वीचा विक्रम, Viral Video

कसलं भारी! आईच्या वाढदिवसाला लेकीने आणला मालिकांचा केक; जन्मदात्रीचा आनंद गगनात मावेना, Video Viral

Ashadhi Wari: दिंडीत मोकाट जनावरांचा हल्ला; अनेकजण जखमी, चिमुकल्यांचाही समावेश

Bhor Police : ५८ पैकी २९ पोलिस कार्यरत, ५० टक्के जागा रिक्त; भोर पोलिस ठाण्याची स्थिती

SCROLL FOR NEXT