MVP election Latest Marathi News esakal
नाशिक

Nashik : ‘MVP’ची निवडणूकप्रक्रिया शुक्रवारपासून?

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्‍थेच्‍या पंचवार्षिक निवडणुकीकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, शुक्रवार (ता. ५)पासून उमेदवारी अर्ज उपलब्‍ध होणार आहेत.

२८ ऑगस्‍टला मतदान, तर २९ ऑगस्‍टला मतमोजणी व निकाल जाहीर केला जाणार असल्‍याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. (MVP election process may start from Friday nashik Latest Marathi News)

जिल्ह्यातील सर्वांत मोठी शैक्षणिक संस्‍था असलेल्‍या मविप्र संस्‍थेच्‍या कार्यकारिणी मंडळाची मुदत ऑगस्‍टमध्ये संपते आहे. २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी पंचवार्षिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीकरिता निवडणूक कार्यक्रम निश्‍चित झाल्‍याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.

शुक्रवार (ता. ५)पासून उमेदवारी अर्जाची विक्री केली जाणार आहे. मतदारयाद्या, घटना व निवडणूक नियमावली निवडणूक मंडळ कार्यालयात विक्रीसाठी उपलब्‍ध करून दिली जाणार असल्‍याची माहिती मिळते आहे. १५ ऑगस्‍टची सुटी वगळता इतर सुट्यांच्‍या दिवशी निवडणूक कार्यालयातील कामकाज सुरू राहणार असल्‍याची माहिती मिळते आहे.

मविप्र निवडणुकीसाठी एक सदस्यीय लवादाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्‍यानुसार अॅड. शिवाजीराव गोविंदराव खालकर यांना संस्थेतर्फे नेमणूकपत्र देण्यात आले.

सरचिटणीस श्रीमती नीलिमाताई पवार, सभापती माणिकराव बोरस्ते व कार्यकारी मंडळ उपस्थित होते. निवडणूक मंडळाचे अध्यक्ष ॲड. भास्‍करराव चौरे, सचिव डॉ. डी. डी. काजळे हे काम सांभाळणार आहेत. सदस्‍य म्‍हणून ॲड. रामदास खांदवे, ॲड. महेश पाटील काम पाहतील.

...असा आहे संभाव्‍य कार्यक्रम

उमेदवारी अर्ज उपलब्‍धता ----------------- ५ ते ११ ऑगस्‍ट

उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची मुदत ----- ७ ते ११ ऑगस्‍ट

लवादाकडे अपिलाची मुदत ---------------- १३ व १४ ऑगस्‍ट

अपिलावर निर्णय देण्याची मुदत ---------- १६ ऑगस्‍ट

पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार --- १६ ऑगस्‍ट

उमेदवारी मागे घेण्याची मुदत ------------- १९ ऑगस्‍ट

उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्धी ----------- १९ ऑगस्‍ट

उमेदवारांना निवडणूक चिन्‍ह वाटप ------ १९ ऑगस्‍ट

मतदान ---------------------------- २८ ऑगस्‍ट

मतमोजणी व निकाल ----------------- २९ ऑगस्‍ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishalgad Qurbani Permission : किल्ले विशाळगडावर उरुस काळात सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देण्यास बंदी; मांसाहार नेण्याबाबत कोर्टाचा काय आहे आदेश?

Vishnu Sahasranama: अधिक मासात विष्णू सहस्त्रनामाचा जप का करतात? रोजही वाचण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत आयपीएल क्रिकेट बेटिंग प्रकरणी भाजपच्या नगरसेवकाला अटक

Pargaon News : अष्टविनायक महामार्गावर अनेक ठिकाणी डांबर उखडून पडले खड्डे; तर महामार्गावरील अनेक बसथांब्यांची दुरावस्था झाली आहे

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

SCROLL FOR NEXT