IndigoReach CEO Peter Elbers speaking at a press conference esakal
नाशिक

My City My Heritage: नाशिक-दिल्ली विमानसेवेसाठी प्रयत्नशील : पीटर एल्बर्स

सकाळ वृत्तसेवा

My City My Heritage : इंडिगोरीच या इंडिगोच्या सीएसआर उपक्रम आणि इंटरग्लोब फाउंडेशन या इंटरग्लोब एन्टरप्रायझेसतर्फे रविवार (ता. ५) शहारात हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते.

याचे नेतृत्व कन्झर्व्हेशन आर्किटेक्ट श्रीमती अमृता उपलेकर यांनी केले. इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स, इंटरग्लोब फाउंडेशनच्या चेअरपर्सन रोहिणी भाटिया, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. (My City My Heritage walk Pushing for Nashik Delhi Air Service Peter Elbers nashik)

‘माय सिटी, माय हेरिटेज’ या माध्यमातून भारतातील विविध शहरांमधील परंपरा आणि संस्कृतीची माहिती लोकांना मिळावी, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती इंडिगोरीचचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर पीटर एल्बर्स यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नोव्हेंबर २०२२ मध्ये याची सुरवात करण्यात आली आहे. यापूर्वी प्रयागराज, भुवनेश्वर आणि शिलाँग येथे असे आयोजन करण्यात आले होते.

अनेक ऐतिहासिक आणि परंपरागत अशी महत्त्वाची ठिकाणे असून, या मोहिमेमुळे ती पाहण्याची आणि त्यांचा प्रसार करण्याची संधी आम्हाला मिळाली, असे प्रतिपादन रोहिणी भाटिया यांनी केले.

या वॉकच्या मार्गामध्ये काळाराम मंदिर, गोरेराम मंदिर, नारोशंकराचे मंदिर, गोदावरी घाट, रामतीर्थ, दुतोंड्या मारुती, गंगा गोदावरी मंदिर, कल्पेश्वर मंदिर, अहिल्याराम मंदिर, सरकारवाडा येथून होऊन वॉकचा शेवट सुंदरनारायण मंदिरात करण्यात आला.

उपक्रमाला स्थानिकांसह सरकारी अधिकारी, इंडिगोरीच व इंटरग्लोब फाउंडेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

नाशिक-दिल्ली विमानसेवा सुरू करणार

नाशिक विमानतळावर सध्या इंडिगोरीचची विमानसेवा सुरू असून, त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

येत्या काळात दिल्ली, बंगळुरूसाठी थेट विमानसेवा, तसेच नाइट लँडिंगसह एअर कार्गो सर्व्हिस सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहोत, असे पीटर एल्बर्स यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

Navi Mumbai : APMC मार्केटजवळ भीषण आग, १० पेक्षा जास्त ट्रक, टेम्पो जळून खाक

Bus-Car Accident : कोल्हापुरातून महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; बस-कारच्या धडकेत चौघे ठार, एक जण जखमी

Panchang 7 July 2025: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा किमान 108 जप करावा

SCROLL FOR NEXT