Crime news esakal
नाशिक

Nashik Crime News : शाळकरी मुलगा राजच्या आत्महत्त्येचे गुढ कायम

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गंगापूर शिवारातील ध्रुवनगरमध्ये दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या अवघ्या १५ वर्षाच्या राजने गळफास घेत आत्महत्त्या केल्याच्या घटनेला चार दिवस उलटले. मात्र अद्यापही त्याने आत्महत्त्या का केली, याचा उलगडा होऊ शकलेला नाही.

याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी शाळा आणि खासगी क्लास परिसरातील सीसीटीव्ही फुटेज्‌ तपासले असून, त्यात अद्यापपर्यत काहीही आक्षेपार्ह आढळून आलेले नाही.

तसेच, पोलिसांनी त्याचे शिक्षक व मित्रांकडे प्राथमिक चौकशी केली असून पोलिसांच्या हाती काहीही ठोस लागू शकलेले नाही. त्यामुळे राजच्या आत्महत्त्येचे गुढ अद्यापही कायम आहे. (Mystery of school boy Raj suicide continues Nashik Crime News)

नुकताच दहावीच्या वर्गात गेलेल्या राज शेलार याने गेल्या बुधवारी (ता. ७) राहत्या घरात दुपारी शाळेतून आल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच बेडरुममध्ये गेला आणि गळफास घेत आत्महत्त्या केली होती.

या घटनेने त्यांच्या कुटूंबियांना मोठा हादरा बसला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या शवविच्छेदन विभागाच्या अहवालातूनही त्यांचा मृत्यु गळफास घेतल्यानेच झाल्याचे निष्पन्न झालेले आहे.

दरम्यान, गंगापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक तानाजी झाडे हे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यांनी राज याच्या शाळेसह खासगी क्लासमध्ये तपास केला. मात्र त्यातून ठोस अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. राजचे मित्र, कुटुंब, नातलग व परिसरातील नागरिकांकडून माहिती पोलीस घेत आहेत.

गेल्या बुधवारी शाळेतून आल्यावर राजने काही वेळातच आत्महत्या केल्याने शाळेतच काही वाद झाले असावेत, या दिशेनेही पोलिसांनी तपास केला, मात्र शाळेतील शिक्षक, मित्रांमध्येही काहीच भांडणे वा वाद त्यादिवशी झालेला नसल्याचे चौकशीतून समोर आले आहे.

कुटूंबियांकडेही चौकशी

लहान मुले हळवी असतात. त्यांना कोणी रागावले वा बोलले तर ते पटकन मनाला लावून घेतात. त्यामुळे क्षणात ते नको ते टोकाचे पाऊल घेण्याचीच शक्यता अधिक असते. त्यामुळे पोलिसांकडून राज याच्या कुटूंबियांकडेही चौकशी करतार आहेत.

राजला घरात कोणी काही रागावले की बोलले याची पोलीस माहिती घेणार आहेत. मयत राजचे वडील सतिष शेलार हे कंपनी कामगार असून त्याची आई गृहिणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Navy Sailor Family Death: नौदलाच्या खलाशासह पत्नी अन् २ मुलांचे मृतदेह आढळल्यानं खळबळ, २ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश

Raigad News: महाड MIDCमध्ये पुन्हा गॅसगळती, एका कामगाराचा मृत्यू, ८ जण जखमी

Viral Video : तीन वर्षांचा चिमुकला आईची तक्रार घेऊन थेट पोलीस चौकीत पोहोचला, म्हणाला- तिला जेलमध्ये टाका; कारण ऐकून पोलिसांनाही आवरेना हसू

Marathi News Live Updates : मुंबईत भारतीय नौदलाचा खलाशी, पत्नी आणि दोन अल्पवयीन मुले मृतावस्थेत आढळली

IND vs SL 1st Test : एकही चेंडू न खेळता, भारत-श्रीलंकेचे खेळाडू जेवायला गेले! गौतम गंभीरचं डोकं फिरलं; गॉलवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT