property tax sakal media
नाशिक

नाशिक : मालमत्ता कराची अपुरी वसुली; विभागीय अधिकाऱ्यांना नोटीस

राजकीय पक्षाकडून वांरवार थकबाकीवर ठेवला जाणारा ठपका पुसावा लागणार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : घरपट्टी माफीसाठी(property tax) राजकीय पक्ष सरसावले असताना दुसरीकडे घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट गाठताना विविध कर विभागाच्या नाकीनऊ आले आहे. एकूण थकबाकी तीनशे कोटी रुपयांपर्यंत पोचली असून, यात शास्तीची रक्कम १२९ कोटी रुपये असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षाच्या अखेरीस म्हणजे मार्च अखेरपर्यंत पन्नास टक्क्यांहून अधिक वसुलीचे उद्दिष्ट महापालिका प्रशासनाला(nashik carporation) गाठून राजकीय पक्षाकडून वांरवार थकबाकीवर ठेवला जाणारा ठपका पुसावा लागणार आहे.

मालमत्ता कराची एकूण थकबाकी २९६ कोटी ४८ लाख ६० हजार इतकी असून यात शास्तीची रक्कम १२९ कोटी रुपये आहे. सातपूर विभागात २३ कोटी ४१ लाख रुपये थकबाकी आहे. पश्चिम विभागात ४४. ५० कोटी, पूर्व विभागात ४२ कोटी २७ लाख ९६ हजार रुपये, पंचवटी विभागात ५८ कोटी ५७ लाख ९० हजार, सिडको विभागात ६८ कोटी ५१ लाख ५३ हजार रुपये, तर नाशिक रोड विभागात ५९ कोटी १९ लाख ८७ हजार रुपये थकबाकी आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये आर्थिक परिस्थिती डामडौल झाली असताना मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी पंचवीस कोटी रुपयांनी अधिक घरपट्टी वसुल झाली आहे. या वर्षी १६५ कोटी रुपये घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ११० कोटी ८६ लाख रुपये वसूल झाले आहेत.

अडीच महिन्यांचा कालावधी शिल्लक

मार्चअखेरपर्यंत थकबाकीची किमान ५० टक्के व नवीन मिळकतींची ८० टक्के इतकी घरपट्टी वसुली करण्याचे उद्दिष्ट गाठायचे आहे. त्यासाठी अवघे अडीच महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. कर सवलत योजनेला थकबाकीदारांकडून प्रतिसाद मिळाला नाही. घरपट्टीची कमी वसुली झाल्यास विभागीय अधिकाऱ्यांना नोटीस पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT