Social Unity : हनुमान मंदिर, शनिमहाराज मंदिर व संत सावता महाराज मंदिर जीर्णोद्धार बांधकामासाठी येथील मुस्लिम समाजातील रशीद शेख यांनी एक लाख रुपये देणगी देऊन हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. (Nagarsool Rashid Shaikh message of unity donation of one lakh for ancient temple of Bajrangbali nashik news)
येथील सुमारे तीनशे वर्षे पुरातन हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार करून तेथे नवीन हनुमान मंदिर, शनिमहाराज मंदिर व संत सावता महाराज मंदिराचे बांधकाम सुरू आहेत. सुमारे सत्तर लाख रुपये खर्चाच्या या मंदिरासाठी नगरसूल परिसरातील अनेकांनी भरीव देणग्या दिल्या आहेत.
मात्र येथील मुस्लिम बांधव रशीद शेख यांनी हिंदू धर्मियांच्या मारुती मंदिरासाठी एक लाखाची देणगी दिली.ती सर्व धर्मियांसाठी लक्षवेधी ठरली आहे. हिंदू-मुस्लिम समाजात मंदिर व मशीद असा भेदभाव करून दोन्ही समाजात तेढ व वाद निर्माण करणाऱ्यांना आपल्या कृतीतून चपराक लगावली आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे. मारुती मंदिर ट्रस्ट व नगरसूल ग्रामस्थांतर्फे रशीद शेख यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री मारुती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुभाषराव निकम, सचिव कारभारी अभंग, प्रमोद पाटील, सुनील निकम, प्रदीप निकम, प्रभाकर निकम आदींसह मारुती मंदिर ट्रस्टचे विश्वस्त व ग्रामस्थ उपस्थित होते.
"ज्या-त्या धर्मात देवांची नावे व रूप बदलतात. परंतु, सर्वांचा देव एकच आहे. मारुती मंदिरामुळे गावाच्या वैभवात नक्कीच भर पडणार आहे."-रशीद शेख, नगरसूल
"गावात सर्वधर्मीय गुण्यागोविंदाने राहतात. देवी-देवतांची उत्सव यात्रा व सण समारंभ सर्व धर्मीय उत्साहात साजरे करतात. हीच परंपरा रशीद शेख यांनी मंदिरास देणगी देऊन अधिक वृद्धिंगत केली आहे."- प्रमोद पाटील, नगरसूल
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.