आशा सेविकांचा नागपूरला मोर्चा
----------------------------
मानधन वाढीसह समायोजनाची मागणी
सकाळ वृत्तसेवा
नामपूर, ता. ४ : अत्यंत तुटपुंज्या मानधनात ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकट करणाऱ्या आशा सेविकांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी यंदाच्या हिवाळी अधिवेशनात आयटकच्या माध्यमातून आशा सेविका मोर्चा काढण्यात येणार असल्याचे संघटनेच्या जिल्हाध्यक्ष सुरेखा खैरनार यांनी सांगितले.
आशा सेविका गेल्या अनेक वर्षापासून अत्यल्प मानधनावर कामकाज करीत आहेत. केंद्र सरकारने २०१८ पासून आशा गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ केलेली नसताना २०२६-२७ च्या वार्षिक पीआयपीमध्ये त्यांच्या मोबदल्यात कपात केल्याने आशा गटप्रवर्तकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. राज्यव्यापी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन राजू देसले, सुरेखा खैरनार यांनी केले आहे.
चौकट
आशा सेविकांच्या मागण्या अशा
आशा गटप्रवर्तकांना सन्मानाची वागणूक मिळावी
दिवाळीपूर्वी प्रलंबित मोबदला खात्यात जमा करावा.
गटप्रवर्तकांचे कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे समायोजन करावे.
भविष्य निर्वाह निधी, राज्य विमा योजना लागू करावा
कोट
गेल्या अनेक वर्षांपासून आशा गटप्रवर्तकांच्या समस्या प्रलंबित आहे. याबाबत वारंवार शासनदरबारी प्रश्न मांडण्यात आले असून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने आंदोलन होणार आहे. आशा सेविकांच्या प्रलंबित प्रश्नांवर आगामी काळात अधिक तीव्रतेने लढा देण्याचा निर्धार संघटनेने केला आहे.
फोटो
-सुरेखा खैरनार, जिल्हाध्यक्ष आशा सेविका संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.