नाशिक

आशा सेविकांचा नागपूरला मोर्चा

CD
नागपूरच्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा : खैरनार सकाळ वृत्तसेवा नामपूर, ता. १४ : आशा सेविकांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी यंदाच्या हिवाळी अधिवेशनात आयटकच्या माध्यमातून १५ डिसेंबर २०२६ ला मोर्चा काढण्यात येणार असून जिल्ह्यातील शंभर टक्के आशा सेविका यांनी मोर्च्यात सहभागी व्हावे, असे आवाहन आशा सेविका संघटनेच्या जिल्हाध्यक्ष सुरेखा खैरनार यांनी केले आहे. आशा सेविका गेल्या अनेक वर्षापासून अत्यल्प मानधनावर कामकाज करीत आहेत. केंद्र सरकारने २०१८ पासून आशा गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ केलेली नसताना २०२६-२७ च्या वार्षिक पीआयपीमध्ये त्यांच्या मोबदल्यात कपात केल्याने आशा गटप्रवर्तकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या अन्यायाच्या निषेधार्थ नागपूर विधानभवनाच्या कार्यालयावर तीव्र निदर्शने करण्यात येणार असून, १५ डिसेंबरला नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर आयटकच्या वतीने मोर्चा काढून केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात येणार आहे. राज्यव्यापी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन राजू देसले, सुरेखा खैरनार अन्य पदाधिकाऱ्यांनी केले आहे. 10214 अनेक वर्षांपासून आशा गटप्रवर्तकांच्या समस्या प्रलंबित आहे. याबाबत वारंवार शासनदरबारी प्रश्न मांडण्यात आले. तरी याबाबत कोणतीही दखल घेतली जात नसल्याने आंदोलन होणार आहे. आशा सेविकांच्या प्रलंबित प्रश्नांवर आगामी काळात अधिक तीव्रतेने लढा देण्याचा निर्धार संघटनेने केला आहे. - सुरेखा खैरनार, जिल्हाध्यक्ष, आशा सेविका संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Traffic Jam: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा; मुंबई-गोवा महामार्गावरही कोंडी

Gavit Sisters Case : भारतात पहिल्यांदा महिलांना मिळणार होती फाशी; कोल्हापूरच्या गावित बहिणींचं क्रौर्य ऐकून थरकाप उडेल!

महाराष्ट्रासाठी अभिमानाची बातमी! लोणार सरोवराला 'जागतिक भूगर्भीय वारसा स्थळाचा' दर्जा; ठरलं भारतातील दुसरं ठिकाण

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग लागू होण्याआधी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? एरिअर्स आणि वाढीव पेन्शन मिळणार की नाही?

Laxman Hake: लक्ष्मण हाके अंतरवाली सराटीत; दुष्काळ प्रश्नावर शेतकऱ्यांसह ओबीसी आंदोलकांशी चर्चा

SCROLL FOR NEXT