NMC Dr. Chandrakant Pulkundwar  and dignitaries Participating in the international meeting of Section 2023.
NMC Dr. Chandrakant Pulkundwar and dignitaries Participating in the international meeting of Section 2023.  esakal
नाशिक

Namami Goda प्रकल्पाचा अहवाल 3 महिन्यात; NMC आयुक्तांचे नदी व्यवस्थापन आंतरराष्ट्रीय परिषदेत आश्वासन

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी महापालिकेने ठोस उपाययोजना केल्या असून , सिंहस्थापुर्वी गोदावरी व उपनद्या पूर्णपणे स्वच्छ दिसतील. नदीकिनारी सौंदर्यीकरण करण्यासाठी नमामी गोदावरी प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू असून साधारण तीन महिन्यांत अहवाल पूर्ण होईल.

त्यानंतर जलशक्ती मंत्रालयाकडे सादर करण्यात येईल. नमामि गोदावरी अंतर्गत प्रस्तावित सर्व कामे आगामी २०२७ च्या सिंहस्थापूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले. (Namami Goda project report in 3 months NMC Commissioners assurance at International Conference on River Management nashik news)

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्सच्या वतीने शहरी नद्यांच्या व्यवस्थापनासाठी धोरणे ठरविणाऱ्या ‘धारा २०२३’ ही दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय बैठक पुणे येथे सुरू आहे.

या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, गोदावरीला मिळणाऱ्या सर्व १९ नाल्यांमधून येणारे दूषित पाणी थांबवून त्यावर प्रक्रिया करण्यात येईल. यामध्ये परिसरातील सर्व नागरिकांचा सक्रिय सहभाग घेऊन लोकसहभागातून हे काम पूर्ण करण्यात येईल.

या कामी निरी तसेच आयआयटी पवई यांची मदत घेण्यात येत आहे. या व्यतिरिक्त दूरगामी परिणाम करणाऱ्या उपाययोजना राबविल्या जाणार आहेत. जलशक्ती मंत्री शेखावत या वेळी उपस्थित होते ते म्हणाले, जल संबंधित क्षेत्रांत भारत सध्या २४० गुंतवणूक करत आहे.

नदी जोडणी, भूजल पुनर्भरण, भूजलाचे नकाशीकरण अशा बाबींचा यामध्ये समावेश आहे. सर्व राज्यांसाठी वॉटरव्हिजन २०४७ हे ध्येय असून, जल सुरक्षा आणि व्यवस्थापन हे आर्थिक विकासाला सुसंगत असेल.

अयोध्या आणि औरंगाबाद या दोन शहरांतील नद्यांच्या व्यवस्थापन योजनांचे अनावरण माननीय मंत्र्यांच्या हस्ते संबंधित शहरांच्या प्रतिनिधीसोबत धारा २०२३ च्या पहिल्या दिवशी करण्यात आले.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

रिव्हर सिटीज अलायन्समध्ये नाशिक

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स (एनआयए) ही शहरी नियोजन आणि विकास यासंबंधी भारतातील थिंक टँक आहे. शहरीकरणाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी, शाश्वत शहरांसाठी मार्ग तयार करण्यासाठी उपाययोजना देण्याचा प्रयत्न एनआयए चा आहे.

देशातील ३० शहरांच्या सहभागातून शहरी नद्यांच्या व्यवस्थापनासाठी रिव्हर सिटीज अलायन्सची सुरवात झाली. गेल्यावर्षी ही सदस्यसंख्या ९५ पर्यंत पोचली आणि आता १०७ शहरे आरसीएचे सदस्य आहेत.

नवीन १२ शहरे रिव्हर सिटीज अलायन्स चे (आरसीए) सदस्य झाले. नव्या शहरांमध्ये नाशिक व नांदेड- वाघाळा या दोन शहरांचा समावेश करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Latest Marathi News Live Update :उद्धव ठाकरे यांची आज अलिबागमध्ये सभा

SCROLL FOR NEXT