पान-२ अँकर
फोटोओळी- 10021
नामपूर : जल्लोष विभागीय स्पर्धेत यश मिळविणाऱ्या हिरे महाविद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांसमवेत प्राचार्य डॉ. यू. बी. कदम.
नामपूर महाविद्यालयाचे ‘जल्लोष’ स्पर्धेत यश
ललित कला विभागात सर्वसाधारण उपविजेते
नामपूर, ता. २ : महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित येथील समाजश्री प्रशांतदादा हिरे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘जल्लोष’ विभागीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत देदीप्यमान यश मिळवले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या सटाणा महाविद्यालयातर्फे झालेल्या या स्पर्धेत नामपूर महाविद्यालयाने ललित कला विभागात सर्वसाधारण उपविजेतेपद पटकावले.
स्पर्धेत महाविद्यालयाचा विद्यार्थी ओम पाटील याने मातीकला, पोस्टर मेकिंग अशा दोन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले. विनिता सोनवणे हिने रांगोळी, व्यंग्यचित्र या दोन्ही स्पर्धांमध्ये द्वितीय पारितोषिक पटकावले. पथनाट्य प्रकारात उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर नामपूर महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक पटकावला. संघात जान्हवी अहिरे, पायल पगारे, प्रीती भामरे, स्नेहल कोर, प्रियांका अहिरे, साक्षी कोर, कोमल सोनवणे आणि निकिता शिंदे यांचा समावेश होता.
यशस्वी विद्यार्थ्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. विविध स्पर्धांमध्ये सहभागी झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो व त्यांच्यात कौशल्य विकसित होते, त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यापुढेही अशा स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. यू. बी. कदम यांनी केले. उपप्राचार्य डॉ. अनिल सावळे यांनी अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळत असल्याचे सांगितले.
यशस्वी विद्यार्थ्यांना सांस्कृतिक विभाग समन्वयक प्रा. हर्शल बच्छाव, संघनायक प्रा. नारायण सोनवणे, प्रा. रितू अहिरे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल प्राचार्य डॉ. यू. बी. कदम, उपप्राचार्य डॉ. अनिल सावळे, शैक्षणिक पर्यवेक्षक डॉ. युवराज भामरे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. संजय शेलार आदींनी सत्कार केला.
........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.