wedding esakal
नाशिक

लग्नपत्रिकेतील नातेवाइकांच्या नावांची जागा घेतली कोरोना प्रतिबंधक सूचनेने

युनूस शेख

नाशिक : सध्या सर्वत्र कोरोना प्रादुर्भावाने (corona virus) थैमान घातले आहे. कुठलाही कार्यक्रम करण्यापूर्वी कोरोना प्रादुर्भावाचा प्रथम विचार केला जात आहे. प्रशासनानेदेखील त्यासंदर्भातील प्रतिबंधक सूचना जारी केले आहे. कोरोना प्रादुर्भावास आळा घालणे केवळ प्रशासनाचे काम आहे, असे नाही तर सामान्य व्यक्तीनेदेखील आपली जबाबदारी ओळखून शासकीय नियमांचे पालन (Corona-Prevention) केल्यास प्रादुर्भाव आटोक्यात येण्यास मदत होणार आहे. याच जाणिवेतून जुने नाशिक कथडा भागातील शिवाजी चौक येथील रहिवासी उत्तम बिरुटे यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या वेळी एक भन्नाट आयडीया शोधून काढली आहे.(names-of-relatives-marriage-certificate-replaced-by-Corona-Prevention-Notice)

नातेवाइकांच्या नावांची जागा घेतली कोरोना प्रतिबंधक सूचनेने

कोरोनामुळे (coronavirus) लग्न पत्रिकेतील ( नातेवाइकांच्या नावांची जागा कोरोना प्रतिबंधक सूचनेने घेतली असल्याचे दिसून येत आहे. जुने नाशिक कथडा भागातील रहिवासी उत्तम बिरुटे यांनी सामाजिक बांधिलकी जपत त्यांच्या मुलाच्या लग्नपत्रिकेवर विवाह सोहळा कोविडच्या शासकीय नियमाप्रमाणे होणार असल्याची सूचना छापून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या मुलाच्या लग्नपत्रिकेत नातेवाइकांच्या नावासाठी राखीव असलेल्या जागेवर कोरोना प्रतिबंधक सूचना छापली आहे. शिवाय ठराविक वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थित विवाह सोहळा करण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी सोहळ्यास येणाऱ्या मंडळींना शासकीय नियमांची आठवण राहावी. या हेतूने विवाह सोहळा कोविडच्या शासकीय नियमानुसार होणार असल्याची सूचना लग्नपत्रिकेवर देऊन वऱ्हाडी मंडळींसह अन्य नागरिकांमध्ये जनजागृतीचा प्रयत्न या माध्यमातून केला आहे. अशाप्रकारे प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखत वेगवेगळ्या पद्धतीने कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठीच्या शासकीय नियमांसह स्वतः विविध प्रतिबंधक नियमांचे पालन केल्यास कोरोना विषाणूला हरविण्यास नक्कीच यश मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT