नाशिक

अभिनेते नाना पाटेकर निधन (विशेष पान)

CD
नटसम्राट ते गोदावरी गौरव ------------------------ नाशिकशी ऋणानुबंध असलेले नाना नाशिकशी गहिरा ऋणानुबंध असलेले पद्मश्री अभिनेते व नाट्यकर्मी नाना पाटेकर यांचे गुरुवारी (ता. ८) पहाटे गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ७५व्या वर्षी निधन झाले. पत्नी नीलकांती पाटेकर नाशिकच्या असल्याने त्यांचे नाशिकशी जिव्हाळ्याचे नाते होते. कुसुमाग्रजांच्या साहित्यकृतीवरील ‘नटसम्राट’ चित्रपटाचा मुहूर्त २७ फेब्रुवारी २०१५ रोजी कुसुमाग्रज स्मारकात झाला होता. गोदावरी गौरव पुरस्कार आणि १९९७ च्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद अशा नाशिकशी जोडलेल्या आठवणींना दिलेला उजाळा... ------- मंत्र्यांच्या प्रतिक्रिया दुष्काळ, भूकंप आणि विविध नैसर्गिक आपत्तींच्या काळात त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत मदतीसाठी पुढाकार घेतला. ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून जलसंधारण, पाणी उपलब्धता आणि ग्रामीण भागातील विविध सामाजिक उपक्रमांसाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. - गिरीश महाजन, पालकमंत्री तथा जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ---- प्रसिद्धीच्या झोतात असताना समाजातील सामान्य माणसाच्या वेदनेशी जोडलेले राहणे, ही नाना पाटेकर यांच्या व्यक्तिमत्त्वाची विशेष ओळख होती. त्यांचा आवाज, संवादफेक, अभिनय आणि साकारलेल्या व्यक्तिरेखा अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहतील. - छगन भुजबळ, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ----- पडद्यावरच्या अभिनयाइतके त्यांचे सामाजिक भानही मोठे होते. शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे करणे किंवा दुष्काळाच्या काळात जनतेच्या मदतीला धावून जाणे यासाठी नाना नेहमीच अग्रणी राहिले. त्यांच्या निधनाने अभिनय क्षेत्राची तसेच समाजाची मोठी हानी झाली आहे. - दादा भुसे, शिक्षण मंत्री ----- नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाक्षेत्रासोबतच सामाजिक कार्याची आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संवेदनशीलपणे उभ्या राहणाऱ्या एका व्यक्तिमत्त्वाची मोठी हानी झाली आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी केलेले कार्य सदैव प्रेरणादायी राहील. - सुहास कांदे, आमदार ---- नानांनी कलेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडली. स्पष्टवक्तेपणा, साधेपणा आणि आपल्या भूमिकेबद्दलची प्रामाणिकता ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती. नाना पाटेकर यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. - ॲड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, मराठा विद्या प्रसारक समाज ---- विश्वास बँकेला ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी सदिच्छा भेट दिली होती. त्यांच्या भेटीने एक नवी जाणीव निर्माण केली. नानांनी आधुनिक शेतीची गरज, खेड्यातील तरुणांचा शहरांकडे येणारा लोंढा, गावांचे हरवत चाललेले जगणे, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्‌समधील आठवणी, तसेच त्यांचा चित्रपट आणि नाट्यप्रवास अशा अनेक विषयांवर त्यांनी कर्मचारीवर्गाशी मनमोकळा संवाद साधला होता. - विश्वास ठाकूर, अध्यक्ष, विश्वास बँक फोटो : (३१७४२) ----------------------------------------------------- आठवणींचे फोटो फिचर ‘दोघांच्या’ आदरापोटी संमेलन पद स्वीकारले नाट्य संमेलनासाठी सर्वानुमते नानांचे नाव पुढे आल्यानंतर नानांची पहिली प्रतिक्रिया ‘नाही’ अशीच होती. संमेलनात कुसुमाग्रज, कानेटकर यांचा सक्रिय सहभाग असल्याचे सांगत नानांनी दोघांच्या आदरापोटी अध्यक्षपद स्वीकारले. दोघांसमोर भाषण करताना भाषा शुध्द असली पाहिजे, त्यासाठी नानांनी भाषणाचा सराव पुण्याच्या रिकाम्या बालगंधर्व रंग मंदिरात केला होता. संमेलनात ते अध्यक्ष कमी कार्यकर्ते म्हणून अधिक वावरले. संमेलन समाप्तीला आशा भोसले यांचा कार्यक्रम पावसामुळे स्थगित करण्यात आला परंतु नाशिककरांसह नानांनी आशाताईंना गळ घातल्यावर त्यांचा संगीताचा कार्यक्रम झाला होता. - जयप्रकाश जातेगावकर, नाट्य व्यावसायिक (३१७३६) ----- माझ्या नावावर खूप ठेवलंय बापानं! १९ जानेवारी १९९७ सावानाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज व ज्येष्ठ नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांच्या साहित्य निर्मितीवर आधारित चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. ते संमेलन पाहण्यासाठी नाना पाटेकर आले होते. तेव्हा नाना म्हणतात की, तात्यासाहेब यांना उगाचच साहेब म्हणायचो, खरे तर ते माझे वडिल. संमेलनात त्यांचा हात पाठीवर फिरला. आज मी माझ्या बापाची अलिबाबाची गुहा पाहायला आलो आहे. नाना म्हणतात, मी खूप श्रीमंत झालो. माझ्या नावावर खूप काही ठेवलंय या बापानं! नानांनी प्रदर्शन केवळ वरवर पाहिले नाही तर, प्रदर्शनातील त्रुटींविषयी सूचना दिल्या. शिवाय अनेक प्रसंग सांगत त्यांनी उपस्थितांना पोटभर हसविले. फोटो : (३१६९९) ------ कुठले सरकार निवडायचे ते ठरवा! आपण फक्त नावापुरते स्वतंत्र झालो. शेतकऱ्याची गुलामी मात्र आजही संपायला तयार नाही. शेतकऱ्याला जनावरांची भाषा कळते मात्र, सरकारला शेतकऱ्यांची भाषा कळत नाही. आपल्या धमण्यांत वाहणारी वेदना शब्दात मांडा असे आवाहन साहित्यिकांना करत जगण्या- मरण्याच्या संघर्षात मरण कधीही पत्करू नका असा सल्ला नानांनी शेतकऱ्यांना दिला. चांगले दिवस येतील नाही तर आपण आणू अशी भावना व्यक्त करीत पाटेकर म्हणाले, आई सांगायची सोन्याच्या भावात एवढी वाढ होते मग गहू तांदळाचा भाव का वाढत नाही? शेतमालाला रास्तभाव हवा पण, प्रत्येक गोष्ट सरकारकडे मागून मिळत नाही. त्यामुळे सरकारकडे मागू नका. कुठले सरकार निवडायचे ते ठरवा अशी रोखठोक भूमिका अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनात नाना पाटेकर यांनी मांडली होती. फोटो (३१७००) --------- नानाशी प्रत्यक्ष भेटीचा योग आला तो असा... नाशिकला १९९७ मध्ये झालेल्या नाट्यसंमेलनाचा अध्यक्ष म्हणून नाना पाटेकर आला होता. संमेलनात आम्ही ४० कलाकारांनी ६० व्यक्तिचित्र रांगोळीत काढून प्रदर्शन भरविले होते. त्या वेळी मी नानाचे पोर्ट्रेट केले होते. सगळ्या कार्यक्रमातून, बैठकांमधून मी २० मिनिटे रांगोळी प्रदर्शन पाहायला वेळ देऊ शकेन असे नानांनी सांगितले आणि रात्री ११-११:३० च्या सुमारास नाना प्रदर्शन पाहायला आला. तो स्वतःच रांगोळीतले व्यक्तिचित्र पाहून स्तब्ध झाला. डोळे पाहून ‘अग्निफुलांची ज्वाला’ असे पटकन म्हणाला. हा फोटो काढण्याची कल्पना त्यांचीच. प्रत्यक्षातला मी, रांगोळीतला मी आणि प्रतिबिंबातला मी असे तिन्ही आले पाहिजे म्हणून फोटो काढायला सांगितला. स्वतः चित्रकार असल्याने रांगोळीतले सगळे बारकावे हेरून कौतुक केले. २० मिनिटे काढून आलेला नाना तब्बल दोन तास रांगोळ्या पाहण्यात रमला. - सुहास जोशी, ज्येष्ठ चित्रकार (३१६९८) -------- ‘बबड्या’ चांगलं काम केलंस.. १९८५ मध्ये नाना पाटेकर यांच्या सोबत ‘आईशप्पत’ नाटक करत होते. तेव्हा अवघी २० वर्षांचे होते. माझ्या भूमिकेचे नाव उल्का इनामदार तर, माझ्या वडिलांची भूमिका नाना साकारत होते. सुरुवातीला नाटकाची तालीम करताना दडपण आले होते की, एवढ्या मोठ्या कलाकारासमोर ताकदीने उभे राहणे आव्हानात्मक होते पण, जसा पहिला प्रयोग झाला तसे नानांनी केलेल्या कौतुकाने भारावून गेले. आणि ‘बबड्या’ (नाटकातले पात्र) चांगलं काम केलंस.. आज माझ्याकडून पार्टी…असं म्हणत आम्हाला जिप्सीमध्ये घेऊन गेला होता. त्या नाटकाचे ५० प्रयोग झाले. आमच्या नाटकाची टीम म्हणजे लेखक मंगेश कुलकर्णी, दिग्दर्शक प्रकाश बुद्धिसागर कलाकार, सोनाली जोशी, नाना पाटेकर आणि मी. गेल्या वर्षी माझ्या मैत्रिणीच्या हॅास्पिटलच्या उद्घाटनाला बेळगांवला ४० वर्षानंतर आमची भेट झाली ती शेवटची.. - विद्या करंजीकर फोटो : (३१६९६) (३१६९७) ------ पुरस्कार देता न आल्याची खंत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाशिक शाखेच्या वतीने देण्यात येणारा वि.वा.शिरवाडकर, प्रा. वसंत कानेटकर पुरस्कार नाना पाटेकर यांना द्यावयाचा होता परंतु ते परदेशात असल्याने त्यांना येणे शक्य नव्हते अन्यथा महेश मांजरेकर व नाना पाटेकर या दोघांनाही परिषदेचा पुरस्कार देण्याचा मानस होता. नानांच्या जाण्याने पुरस्कार देता न आल्याची खंत कायमची राहणार आहे. माझा अभिनयातील पहिला पुरस्कार मला नानांच्या हस्ते मिळाला होता तर, परिषदेच्या वतीने नीलकांती पाटेकर यांना शांता जोग पुरस्कार देण्यात आला होता, त्याप्रसंगी त्या स्वत: उपस्थित राहिल्या होत्या. - सुनील ढगे, सहकार्यवाह, अ.भा.मराठी नाट्य परिषद, मुंबई (३१६९५) ------ नाशिकचे जावई नाना पाटेकर! नाना व नीलकांती यांचा प्रेमविवाह होता. त्या मूळच्या नाशिकच्या असल्याने नानांचे नाशिकशी ऋणानुबंध अधिक घट्ट झाले. लग्नानंतर दोघे वेगळे राहत असले तरी, नानांचा नाशिकमध्ये मित्रपरिवार मोठा होता. नीलकांती बँकेत अधिकारी होत्या, शिवाय नाटकात काम करायच्या. १९७३ मध्ये नीलकांती यांना राज्य नाट्य स्पर्धेत ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ सुवर्ण पदक मिळाले होते. १९८९ मध्ये ‘आत्मविश्वास’ या मराठी चित्रपटासाठी त्यांना राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाला होता. फोटो : ९७व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला महाकवी कालिदास कलामंदिरात उपस्थित असलेले नाना पाटेकर, पत्नी नीलकांती पाटेकर, मुलगा मल्हार पाटेकर फोटो : (३१७१३) (छायाचित्र अतुल देशमुख) --------------------------------------------------------------------- संकलन : दीपिका वाघ ---------------------- फोटो फिचरसाठी - कुसुमाग्रज प्रतिष्ठान गाेदावरी गाैरव पुरस्कार फोटो (३१६९०) - खंडाेबाच लगीन फोटो (३१६९२) - मुंबई येथील निवासस्थानातील फोटो : (३१७४५) - सकाळ कार्यालयातील फोटो : (२११९९) (२११९८) - कुसुमाग्रज स्मारकातील मांजरेकरांबरोबर फोटो : (८५५७२) - नटसम्राट अभिवाचन (९६०७७) - शंकराचार्य नाम फाउंडेशन कार्यक्रम (७८९५६)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhruv Rathee Bengaluru Protest : ध्रुव राठी पहिल्यांदाच उतरला रस्त्यावर! बंगळूरमध्ये SIR विरोधात आंदोलन, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी, मोदींवरही सडकून टीका

Viral Picture : डेल टेक्नॉलॉजीजच्या संस्थापकाच्या पत्नीला सोशल मीडियावर केले ट्रोल; संपत्ती वाचून डोळे पांढरे होतील..!?

Latest Marathi News Live Update: मुख्यमंत्र्यांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले

Palghar Earthquake : पालघरला भूकंप,३.७ रिश्टर स्केलचा धक्का; तलासरी तालुक्यातील कुर्झे केंद्रबिंदू, सात किलोमीटर खोलीवर भूकंपाची नोंद

IMD Rain Alert : मोठी बातमी! माॅन्सूनच्या एक्झिट दरम्यान 22 राज्यांत मुसळधार पावसासह वादळाचा अलर्ट; 70 किमी स्पीडने वाहणार वारे, महाराष्ट्रात कशी स्थिती?

SCROLL FOR NEXT