नाशिक

नाना पाटेकर यांना श्री गुरुदत्त मित्र मंडळातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

CD
NSK26H31799 जळगाव : शिव कॉलनीतील श्री गुरुदत्त मित्र मंडळातर्फे नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण करताना उपस्थित पदाधिकारी, कलाकार व परिसरातील नागरिक. गुरुदत्त मंडळातर्फे नाना पाटेकर यांना श्रद्धांजली संवाद अन् गीतांतून आठवणींना उजाळा; शांती मंत्राचे पठण सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ९ : शिव कॉलनी येथील श्री गुरुदत्त मित्र मंडळातर्फे हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शांती मंत्राचे पठण करून उपस्थितांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी नाना पाटेकर यांच्या गाजलेल्या संवादांचे सादरीकरण करून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. या प्रसंगी गायक उदय कापडणे, मिलिंद सोनवणे आणि प्रा. काकडे यांनी नाना पाटेकर यांचे गाजलेले संवाद आणि गीते सादर केली. त्यांच्या अभिनयातील अजरामर प्रसंगांचे स्मरण करत उपस्थितांनी भावूक वातावरणात श्रद्धांजली अर्पण केली. बालगोपाल, महिला भगिनी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला मंडळाचे पदाधिकारी मनोज भांडारकर, गणेश सोनार, अमर सोनवणे, नाना चौधरी, मिलिंद सोनवणे, पिल्लू सोनार, हर्षल महाजन, ईशांत जैयस्वाल, सुभाष भांडारकर, सुधाकर सोनवणे, प्रशांत गुरव यांच्यासह परिसरातील महिला मंडळाच्या सदस्यांची आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd T20I: विंडीजची ढापाढापी.. संजू सॅमसनची 'विराट' विक्रमाशी बरोबरी, कोहलीने २०१९ मध्ये केलेला असा पराक्रम...

Gangapur News : लग्नानंतर काठी नवऱ्याला मारू नकोस, नाना पाटेकरांच्या त्या मिश्किल प्रतिक्रियेची साक्षी शिरसाटला आठवण

Maharashtra Live News : निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत चिंता; 'इंडिया' आघाडीच्या खासदारांचा राष्ट्रपती भवनाकडे मोर्चा

NCP Expulsion : बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत पुरुषोत्तम जगताप यांच्यासह बंडखोरांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी; विद्यमान अध्यक्षांवर तडकाफडकी कारवाई

Indian Raiway Tickets: GNWL, RLWL, PQWL, TQWL! रेल्वे तिकिटावर दिसणारे हे कोड असतात तरी काय? जाणून घ्या त्यांचा अर्थ

SCROLL FOR NEXT