nandgaon station.jpg
nandgaon station.jpg 
नाशिक

नांदगाव रेल्वेस्थानकावर कोरोना मुक्कामाला थांबला काय? रेल्वे प्रशासनाला सवाल 

संजीव निकम

नांदगाव (जि.नाशिक) : दिल्ली-मुंबई लोहमार्गावर कोरोना फक्त नांदगाव स्थानकावर मुक्कामाला थांबलाय का? असा प्रश्न नांदगावकरांना आता सतावत आहे. अर्थात, त्याला कारणही तसेच आहे. एरवी वर्दळीचे स्थानक आता एखाद्या चित्रपटाप्रमाणे एखाद्या खेडूत स्थानकासारखे भासू लागले आहे.

ब्रिटिशकालीन या स्थानकाची अशी ससेहोलपट कधी थांबणार,

अधूनमधून चोवीस तासांच्या अंतरात अवघ्या दोन गाड्या फलाटावर थांबतात. एवढी दुरवस्था नांदगावच्या रेल्वेस्थानकाची झाली आहे. बरं पॅसेंजर थांबेल, तर ट्रेन अद्यापही सुरू नाही. यामुळे ब्रिटिशकालीन या स्थानकाची अशी ससेहोलपट कधी थांबणार, असा प्रश्‍न नांदगावकरांना पडला आहे. 
मुंबईपासून ते दिल्लीपर्यंत कोरोनाने जणू नांदगावच्या रेल्वेस्थानकावर आश्रय घेतला असावा, असे आता उपहासाने बोलले जात आहे. कोरोनामुळे गाड्या थांबणार नाही, अशी आठमुठी भूमिका रेल्वे प्रशासनाने घेतल्याने लोकप्रतिनिधींच्या पातळीवर आमदार सुहास कांदे यांनी रेल्वेच्या या ताठर भूमिकेविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.

नांदगाव स्थानकावर आता प्रवासासाठी फक्त चारच गाड्या

मात्र खासदार डॉ. भारती पवार नांदगावकरांच्या या प्रश्नावर कधी आवाज उठवितात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आठ महिन्यांपासून थांबलेल्या रेल्वे प्रवासी वाहतूक आता विशेष कोविड ट्रेन म्हणून धावू लागल्या आहेत. भुसावळ मंडळात अन्य स्थानकावर थांबणाऱ्या या विशेष ट्रेन नियमितपणे थांबत असल्याच्या पार्श्वभूमीवर अवघ्या नऊ गाड्यांपैकी पाच गाड्यांचे थांबे रेल्वे प्रशासनाने कोरोना प्रादुभावाचे निमित्त करून काढून घेतल्याने नांदगाव स्थानकावर आता प्रवासासाठी फक्त चारच गाड्या राहिल्या आहेत. थांबणाऱ्या गाड्यांपैकी नागपूरहून कोल्हापूरला जाणारी महाराष्ट्र एक्स्प्रेस नाशिक-मुंबईकडे जात नाही. तर केवळ नागपूरहून येणारी सेवाग्राम एक्स्प्रेस मुंबईला जाण्यासाठी आहे व ती सकाळी सहाला येते व हीच गाडी रात्री आठला भुसावळला जाते. 


नांदगाव स्थानकावर ज्या गाड्या पूर्वीपासून वेळापत्रकानुसार थांबत होत्या. त्यांचे थांबे काढून घेण्याचे काहीच प्रयोजन नसताना रेल्वेची यंत्रणा आकसाने वागणार असेल, तर लोकप्रतिनिधी म्हणून मला नाइलाजाने रस्त्यावर उतरावे लागेल. - आमदार सुहास कांदे  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT