नाशिक

दुष्काळाच्या कचाट्यात नांदगाव; शेतकरी-शेतमजुरांना तातडीची मदत द्या वन जमीनधारकांना ७/१२ उतारे, रोजगार हमीची कामे सुरू करण्याची भाकपची मागणी

CD
फोटो ओळी-11141 नांदगाव : भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे धरणे आंदोलन करताना राजू देसले, मनोहर पगारे, देवीदास भोपळे, भास्कर शिंदे. दुष्काळग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत द्या नांदगावला तहसीलदार कार्यालयासमोर भाकपचे धरणे आंदोलन नांदगाव, ता. ८ : अपुरा पाऊस, पिकांचे झालेले नुकसान आणि चारा-पाण्याचा गंभीर झालेला प्रश्न यामुळे नांदगाव तालुक्यात दुष्काळी परिस्थिती तीव्र असून, शेतकरी आणि शेतमजुरांची आर्थिक कोंडी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, पशुधनासाठी चारा-पाण्याची व्यवस्था करावी आणि रोजगार हमीची कामे तातडीने सुरू करावीत, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तालुक्यातील वन जमीनधारकांच्या प्रलंबित वनदाव्यांच्या फायली स्वीकारून पात्र दावेदारांच्या ताब्यातील जमिनींचे मोजमाप करून त्यांना सात-बारे द्यावेत, तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास भाकपतर्फे एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या बांधावरील कामे रोजगार हमी योजनेतून तातडीने सुरू करावीत. ग्रामरोजगार सेवकांना दरमहा आठ हजार रुपये देण्याच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली. येथील जुन्या तहसीलदार कार्यालयासमोर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव राजू देसले यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. आशा, गटप्रवर्तक, अंगणवाडी, अंशकालीन स्त्री परिचर, पोषण आहार कर्मचारी व उमेद कर्मचाऱ्यांना कर्मचारी दर्जा देऊन पीएफ, ग्रॅच्युइटी, पेन्शन आणि ईएसआयची सामाजिक सुरक्षा लागू करावी, अशी मागणी करण्यात आली. सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून सात-बारा कोरा करावा, पशुधनासाठी चारा-पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, तसेच वन जमीनधारकांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा, अशी मागणी करण्यात आली. मुख्य निवडणूक अधिकारी ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणीही निवेदनात करण्यात आली. पुणे येथे सुरू असलेल्या एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या आंदोलनालाही भाकपने पाठिंबा जाहीर केला. निवेदनावर राजू देसले (राज्य सहसचिव), मनोहर पगारे (जिल्हा सचिव), देवीदास भोपळे (जिल्हा सहसचिव), भास्कर शिंदे (नांदगाव तालुका कमिटी), योगेश जाधव (खजिनदार, भाकप तालुका नांदगाव) आणि प्रकाश भावसार (सहसचिव) यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIR voter list: देशातील 42 निवृत्त न्यायमूर्तींचं खुलं पत्र! SIR वरुन सुरु असलेल्या वादावर स्पष्ट केली भूमिका

India Alliance Protest : 'देश हायजॅक केलाय, लोकशाहीची हत्या सुरूय'; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, आंदोलनासाठी 300 खासदार राजघाटावर

NANA PATEKAR: नाना पाटेकर रोज ६० सिगारेट ओढायचे; वयाच्या ५६व्या वर्षी सोडली सवय, पण हृदयाला झालेलं नुकसान भरून निघतं का? जाणून घ्या

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीचे खासदार राजघाटावर

Nana Patekar Death : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे Cardiac Arrest ने निधन; हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्टमध्ये काय फरक असतो? शरीरात नेमकं काय घडतं?

SCROLL FOR NEXT