A dangerous bend near Hanumangar on the highway.
A dangerous bend near Hanumangar on the highway. esakal
नाशिक

Nashik News: नांदगावला राष्ट्रीय महमार्ग ठरतोय डोकेदुखी! वाहतूक कोंडीसह भरधाव वाहनाने नागरिक त्रस्त

सकाळ वृत्तसेवा

नांदगाव (जि. नाशिक) : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणाहून काढण्यात आलेला जळगाव-चांदवड हा नवीन नव्या राष्ट्रीय महामार्ग नांदगावकरांसाठी डोकेदुखी वाढविणारा ठरत आहे. याठिकाणी सतत वाहतुकीची होत असलेली वर्दळ आणि भरधाव जात असलेली वाहनांनी नागरिक त्रस्त झाले आहे. (Nandgaon National Highway becoming headache Citizens suffer from traffic jams and rush vehicles Nashik News)

दळणवळण जलद होण्याच्या उद्देशाने नांदगाव शहरातून जळगाव-चांदवड हा नवीन नव्या राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. मात्र महामार्गावर सतत होत असलेली वाहनांची वर्दळ स्थानिक नागरिकांना त्रासदायक ठरत आहे.

यातच जुन्या पंचायत समितीपासून न्यू इंग्लिश स्कूल पावेतोच्या धोकादायक वळण रस्त्यावर वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे एखादी अघटित घटना घडण्याच्या भीतीने या परिसरातील नागरिक धास्तावले आहेत.

जळगाव-चांदवड हा जुना राज्यमार्ग सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे नव्या राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्यात आले असल्याने सध्या या रस्त्यावरचे दळणवळण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

तर शहरातील हनुमाननगर जवळील वळण रस्ता धोकादायक बनला आहे. असून या ठिकाणी रंबल बसविण्याच्या सध्या मागणीकडे हायवे प्राधिकरणाच्या अभियंत्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. परिणामी अवजड वाहनांची मोठी वर्दळ वाढली आहे.

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

अवजड वाहनांची मोठी वर्दळ

या महामार्गवर पानेवाडी इंधन प्रकल्पातून शेकडोच्या संख्यने टँकर, खडी वाहून नेणारे डंपर, कंटेनर याची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुर असते.

शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील वाहनांना बाहेर पडण्यासाठी बाह्य वळण रस्ता काढण्यात आला नसल्याने जोवर बाह्य वळण रस्ता काढण्यात येत नाही तोवर या रस्त्यावर वेगाने वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर निर्बंध आणण्याची आवश्यकता आहे.

त्यामुळे महामार्ग संलग्न असणाऱ्या नागरी वसाहती बघता विशेषतः हनुमानगर जवळील धोकादायक वळणावर रंबल टाकण्याची मागणी शरद आहेर यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी खासदार उन्मेष पाटील व आमदार सुहास कांदे यांचे देखील लक्ष वेधले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Train Accident: फक्त नितीश कुमार नाही तर या दोन रेल्वेमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारून दिलेला राजीनामा! कोण होते ते?

Latest Marathi Live Updates : केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तातडीने पश्चिम बंगालला रवाना

Babar Azam : बाबर आझमने मोडला MS धोनीचा 'ग्रँड रेकॉर्ड'! कर्णधार म्हणून केली मोठी कामगिरी

Pune Draught: पुणे जिल्ह्यात पारंपारिक दुष्काळ! शरद पवारांचं मुख्यंमत्र्यांना पत्र; म्हणाले, कायमचा...

Kanchanjunga Express Accident: कांचनजंगा एक्स्प्रेसचे डबे उडाले, मालगाडीची मागून धडक! भीषण अपघात कसा घडला? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरारक अनुभव

SCROLL FOR NEXT