नाशिक

खासगी टेलिफोन कंपनीच्या खोदकामाचा ग्रामीण पाणीपुरवठ्याला फटका!१५० एमएम मुख्य जलवाहिनी फुटल्याने बायपासचा पर्याय;

CD
पान एक --------------- 11213 नांदगाव: गायत्री हॉटेल जवळ फुटलेली जलवाहिनीची सुरू असलेली दुरुस्ती. दुसऱ्या छायाचित्रात शिवसृष्टी समोरील मनमाड रस्त्यावर हिसवळकडे जाणाऱ्या ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या जलवाहिनीच्या दुरुस्ती साठी काम करीत असलेले दुरुस्ती पथक. नांदगावमध्ये तिसऱ्या दिवशीही पाणीपुरवठा विस्कळीत नागरिकांमध्ये संतापाची लाट; दुरुस्तीच्या खर्चावरून संभ्रम कायम सकाळ वृत्तसेवा नांदगाव, ता. १७ : खासगी टेलिफोन कंपनीकडून भूमिगत केबल टाकण्यासाठी करण्यात आलेल्या अनियोजित खोदाईमुळे गिरणा धरणावरील ५६ खेडी नळपाणी पुरवठा योजनेची १५० एमएम व्यासाची मुख्य जलवाहिनी फुटल्याची गंभीर घटना घडली आहे. यामुळे शहरालगतच्या श्रीराम नगर, गिरणा नगरसह परिसरातील ग्रामीण भागाचा पिण्याच्या पाणीपुरवठा तिसऱ्या दिवशीही विस्कळीत झाला आहे. विशेष म्हणजे, ही जलवाहिनी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या अखत्यारीत असताना, खोदाईसाठी केवळ नगरपालिकेची परवानगी घेण्यात आली असून महामार्ग प्राधिकरण, संबंधित ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषदेची कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आली नसल्याचे उघडकीस आले आहे. शहरांतर्गत एका कंपनीने केलेल्या खोदाईमुळे पालिकेने चार लाख रुपयांची नुकसानभरपाई वसूल केली; मात्र ग्रामीण भागात अशी कोणतीही वसुली झालेली नाही. दरम्यान, घटनेनंतर सलग तिसऱ्या दिवशीही खंडित झालेली जलवाहिनी पूर्वपदावर आलेली नव्हती. नादुरुस्त जलवाहिनीला पर्याय म्हणून बायपास करणारी १५० एमएम व्यासाची आणि २०० फूट लांबीची नवीन जलवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव देखभाल-दुरुस्ती पथकाने दिला होता; परंतु संबंधित टेलिफोन कंपनीने त्यास होकार न दिल्याने पाणीपुरवठा सुरळीत होण्याबाबतचा संभ्रम कायम राहिला आहे. ------ कारभारावर प्रश्‍नचिन्ह प्रशासन आणि टेलिफोन कंपनीच्या कारभारावर या संपूर्ण प्रकारामुळे अनेक गंभीर प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. जलवाहिनीचे अचूक मॅपिंग न करताच जमिनीखाली खोदाई कशी करण्यात आली? नगरपालिकेने परवानगी देताना जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जलवाहिनीबाबत तांत्रिक विचारणा का केली नाही? जलवाहिनीच्या नुकसानीची जबाबदारी स्वीकारून दुरुस्तीचा संपूर्ण खर्च देण्याबाबत टेलिफोन कंपनीकडून टाळाटाळ का होत आहे? असे प्रश्‍न नागरिकांकडून विचारले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या ४८ प्रश्नांच्या अर्जावर सुप्रीम कोर्टात काय घडलं? कपिल सिब्बल यांनी केली 'ही' मागणी

MPSC Group C Exam : एमपीएससी गट-क परीक्षार्थींना दिलासा; आरक्षणाचे दावे बदलता येणार, नव्याने अर्ज करण्याची गरज नाही

Encroachment Crime : गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावर अतिक्रमणांवर कारवाई; अतिक्रमणमुक्त परिसर ठेवणे प्रशासनासाठी आव्हानात्मक

Amravati Farmers : दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची प्रतीक्षा; अमरावती जिल्ह्यात नमो निधीचे तीन हप्ते रखडले

Vande Bharat Sleeper : इडली-डोशानंतर आता वंदे भारतमध्ये पुरणपोळी! आयआरसीटीसीचा रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव

SCROLL FOR NEXT