धुळे : टुडे पान २ साठी...
--
धुळ्यात आज रंगणार
२२ वे नांदी साहित्य संमेलन
--
मराठी साहित्याचा उत्सव; साहित्यिकांची उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २ : पुणेस्थित महाराष्ट्र साहित्य परिषद, शासनाचा भाषा विभाग, मराठी भाषा महामंडळ आणि महाराष्ट्र साहित्य परिषद जिल्हा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने २२ वे ‘नांदी’ मराठी साहित्य संमेलन मंगळवारी (ता. ३) धुळ्यात होत आहे. मराठी साहित्याच्या या महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून साहित्यिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
जयहिंद शैक्षणिक ट्रस्टचे अध्यक्ष विजय पाटील संमेलनाचे उद्घाटन करतील. संमेलनाध्यक्षपदी प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी असणार आहेत. प्रा. उषा पाटील या स्वागताध्यक्षा म्हणून काम पाहणार आहेत. महापौर मायादेवी परदेसी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील. सोहळ्याला गझलकार प्रदीप निफाडकर, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कोषाध्यक्ष प्राचार्य तानसेन जगताप, उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. संजीव गिरासे, विभागीय कार्यवाह गणेश आढाव, जळगाव जिल्हा प्रतिनिधी प्राचार्य डॉ. वासुदेव होले याची प्रमुख उपस्थिती राहील. संमेलनात विविध परिसंवाद, कथाकथन आणि निमंत्रित कवींचे संमेलन होणार आहे. परिसंवादामध्ये प्रा. डॉ. शशिकला पवार, प्रा. फुला बागूल, प्रा. डॉ. योगिता पाटील, प्रभाकर शेळके, दिलीप लोखंडे, प्रभाकर भामरे, निंबाजीराव बागूल आणि रमेश धनगर सहभाग घेणार आहेत. जिल्ह्यातील साहित्यप्रेमींनी संमेलनाला उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषद धुळे जिल्हा शाखेतर्फे केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.