पान-२
---------
३६-२
नंदिनीचे पाणी चमत्काराने
स्वच्छ होणार आहे का?
गोदावरी प्रदूषणप्रश्नी न्यायालयाचे खडे बोल
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ७ : गोदावरी नदीत मिसळणारे मलजल आणि विषारी रसायने तसेच नदीपात्रातील बेकायदा बांधकामांप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयात दुसरी सुनावणी झाली. यावेळी नंदिनी नदीतून गोदावरीत जाणारे पाणी अत्यंत घातक असून ते कोणत्याही चमत्काराने स्वच्छ होणार नाही. त्यामुळे या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करावी, असे खडे बोल न्यायमूर्ती ए. एस. गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाने नाशिक महापालिकेला सुनावले.
गोदावरी व तिच्या उपनद्या तसेच भूजलातील औद्योगिक प्रदूषणप्रश्नी २७ ऑक्टोबरला याचिका दाखल झाली आहे. पिण्याच्या पाण्यातील सुरक्षित मर्यादेपेक्षा क्रोमियमचे प्रमाण तब्बल एक हजार पट अधिक आढळल्याने न्यायालयाने महापालिकेला फटकारले होते. नंदिनी नदीत सोडलेले प्रदूषित पाणी अखेर गोदावरीतच मिसळते, मग तेथे कोणता चमत्कार होऊन पाणी स्वच्छ होणार, अशी विचारणा खंडपीठाने केली.
अंबड व दत्तनगर परिसरातील क्रोमियमयुक्त पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर झालेले दुष्परिणाम दर्शविणारी छायाचित्रे याचिकाकर्त्यांनी सादर केली. लाखो नागरिक आणि आगामी कुंभमेळ्यातील भाविकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे न्यायालयाने नमूद केले. मुख्य सचिवांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देशही दिले. रामतीर्थातील बेकायदा बांधकामे, टॉवर व मेकॅनिकल गेट्सबाबत महापालिकेकडून खुलासा मागविण्यात आला. पुढील सुनावणी २१ नोव्हेंबरला होणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत प्रवीण शिलावट यांसह पर्यावरण प्रेमींनी दिली.
-----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.