टूडे साठी
------------
वृक्ष संरक्षणासह ‘नंदिनी’ स्वच्छतेची कारवाई निरंक
पर्यावरणप्रेमींकडून कारवाई, खर्चाचा हिशेब जाहीर करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १८ : शहरातील वृक्षांचे संरक्षण आणि नंदिनी नदी स्वच्छतेबाबत नाशिक महापालिकेच्या कामकाजावर माहिती अधिकारातून प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. झाडांवर अनधिकृत जाहिरात फलक, खिळे, लोखंडी पट्ट्या आणि विद्युत रोषणाई लावणाऱ्यांवर केलेली कारवाई तसेच नंदिनी नदी स्वच्छतेवर झालेला खर्च या दोन्ही बाबींची माहिती पर्यावरणप्रेमींनी मागविली असता, महापालिकेच्या सातपूर विभागातील वृक्ष प्राधिकरण विभागाने ‘निरंक’ असे उत्तर दिले आहे.
निसर्गसेवक युवा मंचचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी १८ सप्टेंबर २०२६ रोजी माहिती अधिकाराअंतर्गत अर्ज दाखल केला होता. गेल्या वर्षभरात झाडांवर अनधिकृत जाहिरात फलक लावणे, खिळे ठोकणे, लोखंडी पट्ट्या बसविणे आणि विद्युत रोषणाई करण्याच्या प्रकारांमध्ये किती नोटिसा बजावल्या व किती दंड वसूल केला, अशी विचारणा करण्यात आली होती. त्यावर उद्यान निरीक्षक तथा जनमाहिती अधिकारी यांनी दिलेल्या उत्तरात कारवाईचा तपशील ‘निरंक’ असल्याचे नमूद केले. विशेष म्हणजे, याच अर्जात नंदिनी नदी स्वच्छतेसाठी गेल्या वर्षभरात झालेल्या खर्चाची माहितीही मागविण्यात आली होती. त्यालाही ‘निरंक’ असे उत्तर मिळाल्याने नदी स्वच्छतेच्या कामांवर नेमका किती निधी खर्च झाला, असा प्रश्न निर्माण झाला आहे. झाडांचे नुकसान करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अनधिकृत फलक व रोषणाई हटवावी, तसेच नंदिनी नदी स्वच्छतेसाठी मंजूर निधी, खर्च, कामांची बिले आणि प्रत्यक्ष कामांचा तपशील सार्वजनिक करावा, अशी मागणी कुलकर्णी यांनी केली आहे.
-------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.