late nandkumar aher
late nandkumar aher esakal
नाशिक

नंदकुमार आहेर हत्याप्रकरणातील 2 अल्पवयीनांसह चौघे ताब्यात

राजेंद्र बच्छाव

सिडको (जि. नाशिक) : अंबड येथील आहेर इंडस्ट्रीजचे व्यवस्थापक नंदकुमार आहेर यांच्या हत्येप्रकरणी (Murder Case) अंबड पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात तर अन्य दोघांना अटक केली आहे. (Nandkumar Aher murder case Series of murders in city Nashik News)

मंगळवारी (ता.७) सकाळी १० वाजेच्या सुमारास सिमेन्स कंपनी जवळ आहेर कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ चौघांनी आहेर यांच्यावर चाकू व तलवारीने वार करून त्यांची हत्या केली. घटनेनंतर पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे व पोलिस उपायुक्त विजय खरात यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक श्रीकांत निबांळकर, पोलिस निरीक्षक नंदन बगाडे, गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक गणेश शिंदे व उपनिरीक्षक संदीप पवार यांनी या घटनेतील पहिला अल्पवयीन जखमी संशयितास घटनेनंतर काही वेळातच ताब्यात घेतला.

त्या नंतर या घटनेतील दुसरा संशयित सिद्धार्थ ऊर्फ गोलू जगदीश गायकवाड (वय २१, रा. चाळीसगाव) याला बुधवारी रात्री चाळीसगाव येथून तर तिसरा संशयित पियुष अशोक माळोदे (वय १९, रा. मारुती संकुल, दत्तनगर) येथून ताब्यात घेतले. चौथा संशयित अल्पवयीन मुलास आज सकाळी दत्तनगर भागातून ताब्यात घेतले. या संशयितांना न्यायालयात हजर केले जाणार असून त्यानंतर त्याच्याकडून घटनेची अधिक चौकशी केली जाईल, असे तपासी अधिकाऱ्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तुम्ही दहा वर्षांत काय केले हे पाहा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

ED : ‘ईडी’वर अंकुश! न्यायप्रविष्ट प्रकरणांत आता थेट अटक होणार नाही

Loksabha Election 2024 : मुंबईत आज ‘महासंग्राम’; सांगता सभांमुळे राजकीय तापले वातावरण

Sugar : केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार ‘तिखट’; ९० लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता

अग्रलेख : ‘आप’ भी...?

SCROLL FOR NEXT