नाशिक

नांदूरमध्यमेश्वरमध्ये पक्षी सप्ताहाला प्रारंभ

CD
मुख्य अंक -------------- नांदूरमध्यमेश्वरला पक्षी गणनेत ११ हजार ७८० स्थलांतरित पक्ष्यांची नोंद सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ५ : अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्या जयंतीनिमित्त नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात गुरुवारी (ता. ५) पक्षी सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. यानिमित्त आयोजित पक्षीगणनेत ११ हजार ७८० स्थलांतरित, विदेशी व देशी पक्ष्यांची नोंद करण्यात आली. अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांची जयंती ५ नोव्हेंबर आणि पक्षीशास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांची जयंती १२ नोव्हेंबर या कालावधीत पक्षी सप्ताह साजरा केला जातो. गुरुवारी सकाळी सातला पक्षीगणनेला सुरुवात झाली. यावेळी मारुती चितमपल्ली आणि डॉ. सलीम अली यांच्या प्रतिमांना हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक कृष्णा भवर होते. पक्षीमित्र संघटनेच्या वतीने ज्येष्ठ पक्षीमित्र दत्ताकाका उगावकर यांना जीवनगौरव, तर पक्षीमित्र, छायाचित्रकार, आनंद बोरा यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. डॉ. उत्तम डेर्ले यांनी अभयारण्यातील पाणथळ क्षेत्रातील टायफा वनस्पती काढणे, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कूपनलिका व तलावांची निर्मिती करण्याची गरज व्यक्त केली. करंजगावचे सरपंच खंडू बोडके यांनी गोदावरी नदीपात्रातील पाणवेलींचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. उपवनसंरक्षक कृष्णा भवर यांनी पक्षी सप्ताहाचा उद्देश आणि यंदा अभयारण्यात दाखल झालेल्या नवीन विदेशी पक्ष्यांची माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास वनविभागाचे अधिकारी, बीएनएचएसचे प्रतिनिधी, पक्षीमित्र, वनकर्मचारी, गाईड, संरक्षण पथक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Threat: एकसोबतच 16 विमानांना बॉम्बने उडवण्याची धमकी; हवेतच बदलले मार्ग.. बचावासाठी पाठवले फायटर जेट्स

Crime News: प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री, अभिनेत्यासह तिघांना अटक; आधी डॉक्टरला घरी बोलावले, नंतर...

CJP Protest: पुन्हा जंतर-मंतर! SIRच्या विरोधात सीजेपीचे ७ नोव्हेंबरला आंदोलन; ठिकाणही ठरले

JDU: जेडीयूच्या आढावा बैठकीत मंत्री अशोक चौधरींवर गंभीर आरोप, पक्षाच्या नेत्यांनी दिली थेट लेखी तक्रार

US Midterm Elections: भारतीय वंशाच्या मतदारांचा ट्रम्प यांना धोबीपछाड? सर्वेक्षणातील आकडेवारी काय सांगतेय

SCROLL FOR NEXT