नाशिक

अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत ६९ लाखाचा मुद्देमाल जप्त

CD
फोटो : NSK26H31727 नंदुरबार : अन्न व औषध प्रशासनाने जप्त केलेला पान मसाला. ------------- नंदुरबारला ३९ लाखाचा पान मसाला जप्त अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; गुन्हा दाखल सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. ८ : अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या विमल पान मसालाची वाहतूक करणारे आयशर वाहन पकडून एकूण अंदाजित ३९ लाख ४७ हजार १५० रुपये किमतीचा पानमसाला जप्त केला आहे. बुधवारी (ता. ७) पहाटे सुमारे २.४५ वाजता करण चौफुली ते जकातफाटी रस्त्यावर, करण चौफुलीजवळ धुळेकडे जाणाऱ्या वाहनाची (क्र. एमएच- ४८- डीक्यु- ६०६२) तपासणी करण्यात आली. या वेळी वाहनामध्ये राज्यात प्रतिबंधित असलेला विमल पानमसाला व वी- १ तंबाखू आढळून आली. यात ३९ लाख ४७ हजार १५० रुपयांचा पान मसाला, ३० लाख रूपये किमतीचे आयशर वाहन असा एकूण अंदाजित ६९ लाख ४७ हजार १५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी तुषार देवरे, सुरेंद्र रोहित डौले, संकेत आबा सदाफुळे यांच्या पथकाने आयुक्त तुकाराम मुंडे, सहआयुक्त मंगेश माने व सहायक आयुक्त सपना गोडसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केली. या प्रकरणी वाहनचालक मोहम्मद हलीम व इतर संबंधितांविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्रात प्रतिबंधित अन्न पदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक व विक्री यावर सातत्याने विभागामार्फत लक्ष ठेवण्यात येत असून, अशा प्रकारच्या गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासनाने कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patekar Passes Away : "पोटातली भूक भुतापेक्षा भयाण होती..."; वयाच्या १३ व्या वर्षी सुरू झालेली नाना पाटेकरांची 'दोन गुरूं'ची भावुक आत्मकहाणी

SA vs AUS Schedule: ८ वर्षांनंतर जुने हिशोब चुकते होणार?'सँडपेपरगेट' राड्यानंतर पुन्हा ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकेत खेळणार

Latest Marathi News Live Update: अजिंठा- अंधारी धरणात पाटबंधारे विभागाची धडक कारवाई

Shirur News : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वृत्ताने आज शहर व परिसरातील कलाक्षेत्रावर शोककळा

नाना पाटेकर गेले, पण त्यांनी उभा केलेला ‘तो माणूस’ अजूनही जिवंत! राज ठाकरेंची भावूक पोस्ट

SCROLL FOR NEXT