नाशिक

घरफोडीच्या गुन्ह्यातील दोघांना अटक

CD
34730 नंदुरबार : संशयितांकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल. शेजारी पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील व पथकातील कर्मचारी. ----------------- घरफोडीच्या गुन्ह्यातील दोघांना अटक लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. ७ : शहरात भरदिवसा झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात दोन संशयित यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून २० लाख ५८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने ही कामगिरी केली. नंदुरबार शहरातील पुष्पा विनोदकुमार चिंतलागे यांच्या बंद घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातून एकूण १५ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. यात सोने,चांदीचे दागिने व रोख रकमेचा समावेश होता. याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा समांतर तपास सुरु असताना लालबाग कॉलनी परीसरातील घरफोडी ही आकाश सोनार व त्याचा साथीदार रोहित मोरे यांनी केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळाली. त्यानंतर संशयित कारने गुन्ह्यातील सोने चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी संशयित धुळे चौफुलीकडे जाणार असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने सापळा रचला. जगतापवाडी चौफुली येथे नाकाबंदी करून पथकाने कारची (जीजे०५ जेबी ७७८८) तपासणी केली. या वाहनात आकाश भिका सोनार (वय २७, रा. ओम साई पार्क, होळ शिवार, नंदुरबार), रोहित किशोर मोरे (वय २१, रा. वाठोडा ता. शिरपूर जि. धुळे ह.मु. शांतीनगर, सुरत गुजरात) हे दोघे बसलेले होते. तपासणीत एका लाल रंगाच्या पिशवीमध्ये १४ लाख ४८ हजार रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने मिळून आले. संशयितांकडून १४ लाख ४८ हजार रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने, १० हजार रुपये किमतीचा मोबाईल व ६ लाख रुपये किमतीचे गुन्हा करण्यासाठी वापरलेले चारचाकी वाहन असा एकूण २० लाख ५८ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ------- यांनी केली कामगिरी सदरची कामगिरी जिल्हा पोलिस अधीक्षक अश्विनी सानप, अपर अधिक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अभिषेक पाटील, उप निरीक्षक महेश निकम, विकास गुंजाळ, हवालदार दिनेश चित्ते, मुकेश तावडे, योगेंद्र सोनार, मोहन ढमढेरे, अभय राजपुत, हेमंत बारी, मनोज महाजन, विनोद पाटील, रोहिणी धनगर यांच्या पथकाने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमेरिकेत खळबळ! पत्नीने AIच्या मदतीने रचला पतीच्या हत्येचा कट? ChatGPTच्या विरोधात खटला दाखल

यंदाची दिवाळीही सीमेवरील जवानांसोबत! पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना दिल्या खास शुभेच्छा, पाहा VIDEO

Devendra Fadnavis : 'गोकुळ'वर ताबा मिळवण्याचा प्रश्नच नाही! CM फडणवीसांनी सांगितलं संचालक नेमण्यामागचं नेमकं कारण

Latest Marathi News Live Update: पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल

Rohit Pathare case : २४ वर्षीय रोहित पठारेला घरातून उचललं, झाडाला बांधून बेदम मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू

SCROLL FOR NEXT