नाशिक

नंदुरबारात घरफोडी करणारी टोळी गजाआड

CD
NSK26H33062 नंदुरबार : संशयितांकडून जप्त केलेला मुद्देमाल व दुचाकी. --- नंदुरबारात घरफोडी करणारी टोळी गजाआड --- दोन लाख ५६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. १९ : शहरात घरफोडी करणाऱ्या टोळीतील सात जणांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. यात दोन विधिसंघर्षीत बालकांचा समावेश आहे. संशयितांकडून एकूण दोन लाख ५६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल व २५ हजारांचा गावठी कट्टा व चार हजारांची दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या पथकाने संशयितांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले. यात राजन रायसिंग पाडवी (वय २०, रा. प्रधान हट्टी, तळोदा), विक्की ऊर्फ मिक्की रायसिंग तडवी (२२), रघुवीर ऊर्फ रघू गंगाराम पाडवी (२०, रा. मरिमाता मंदिरामागे, तळोदा), परेश ऊर्फ लल्ला रवी वळवी (१८ वर्ष ३ महिने, ईलाही चौक, तळोदा) दर्शन ऊर्फ लकी प्रवीण चौधरी (२३, मीरा कॉलनी, तळोदा) व दोन विधिसंघर्षीत बालकांचा समावेश आहे. त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. संशयितांकडून नंदुरबारातील गुन्ह्यातील ९० हजारांची रोकड, २२ ग्रॅमचे चांदीचे शिक्के व ८० हजारांच्या दोन दुचाकी, असा एकूण एक लाख ७४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, तसेच उपनगर पोलिस ठाण्यातील गुन्ह्यातील ३२ हजार २०० रुपयांची विदेशी मद्य, १० हजारांचा मोबाईल व ४० हजारांची दुचाकी, असा एकूण ८२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एका विधी संघर्षग्रस्ताकडून २५ हजारांचा गावठी कट्टा व ४ हजारांची दोन जिवंत काडतूस हस्तगत केली. त्यास तळोदा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अश्विनी सानप, अपर अधीक्षक अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अभिषेक पाटील, उपनिरीक्षक महेश निकम व विकास गुंजाळ, परिविक्षाधीन उपनिरीक्षक स्वप्नाली रोकडे, हवालदार दिनेश चित्ते, मुकेश तावडे, सुनील येलवे, मोहन ढमढेरे, योगेंद्र सोनार, अंमलदार हेमंत बारी, अभय राजपूत, विनोद पाटील यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Result 2026 : तब्बल तीन तासांच्या राजकीय गोंधळानंतर गोकुळचा निकाल जाहीर, सतेज पाटील गोकुळचे किंगमेकर

CJP च्या नेत्यांच्या अडचणीत वाढ; जंतरमंतर आंदोलन प्रकरणी आशुतोष रांका आणि सौरव दास यांना न्यायालयीन धक्का!

Tiger Shroff Firing Case : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील आरोपींना पकडणाऱ्या कोण आहेत आयपीएस तेजस्विनी गौतम?

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Daler Mehndi: 'मद्य पिऊन गाऊ नका..!' उत्तराखंडच्या मंत्र्यांनी दलेर मेहंदी यांना मंचावरच विचारला जाब

SCROLL FOR NEXT