नाशिक

सहकार विभागातर्फे पतसंस्था कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

CD
फोटो : 35268 नंदुरबार : प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांचा गौरव करताना एस. वाय. पुरी, तानाजी कवडे, सोपान शिंदे, गिरीश महाले, आर. आर. राठोड, बी. बी. अहिरे व प्रकाश खैरनार. ---------------- सहकार विभागातर्फे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण नंदुरबार, ता. १८ : सहकार क्षेत्र अधिक सक्षम, पारदर्शक व कार्यक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नंदुरबार यांच्यातर्फे जिल्ह्यातील नागरी, ग्रामीण व नोकरदार पतसंस्थांच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण झाले. हे प्रशिक्षण कन्यादान मंगल कार्यालयात झाले. सहकार सप्ताहानिमित्त हे प्रशिक्षण झाले. जिल्हा उपनिबंधक एस. वाय. पुरी अध्यक्षस्थानी होते. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे राज्य समन्वयक तथा निवृत्त सहनिबंधक धनंजय डोईफोडे, निवृत्त सहनिबंधक तथा राज्याचे लेखापरीक्षक तानाजी कवडे, निवृत्त जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे, सहाय्यक निबंधक गिरीश महाले, आर. आर. राठोड, बी. बी. अहिरे व प्रकाश खैरनार उपस्थित होते. प्रशिक्षणादरम्यान धनंजय डोईफोडे, सोपान शिंदे व तानाजी कवडे यांनी कर्जवसुलीची प्रभावी कार्यपद्धती, थकीत कर्जवसुलीचे महत्त्व, सहकार कायद्यातील नियम, अधिनियम व विविध कलमांची माहिती दिली तसेच पतसंस्थांचे कामकाज अधिक पारदर्शक, सक्षम व कायदेशीर तरतुदींनुसार चालविण्यासाठी आवश्यक बाबींचे मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणास जिल्ह्यातील विविध नागरी, ग्रामीण व नोकरदार पतसंस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MG Road वरील खाऊ गल्लीत FDA ची धडक कारवाई; परवाना नसलेल्या पाच खाद्यविक्रेत्यांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश

Yuzvendra Chahal 400 T20 Wickets: युझवेंद्र चहलने इतिहास रचला... ट्वेंटी-२०मध्ये असा पराक्रम करणारा पहिला भारतीय गोलंदाज

Youngest Demat Account Holder : वय अवघे ६ दिवस अन् थेट शेअर बाजारात एन्ट्री! १२ दिवसांचा जुना रेकॉर्ड मोडत दिल्लीच्या चिमुकल्याने रचला नवा विश्वविक्रम

Sudhir Mungantiwar : "आपलं सरकार इंग्रजांपेक्षाही वाईट..."; सुधीर मुनगंटीवार आक्रमक, मुख्यमंत्र्यांसमोरच मांडली भूमिका, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : सोनं-चांदी दरात पुन्हा घसरण; सोनं 2 हजार 800 रुपयांनी तर चांदी चार हजार रुपयांनी घसरली

SCROLL FOR NEXT