नाशिक

नंदुरबार शहरातील विविध विकास कामांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर

CD
फोटो : NSK26H34655 (विजयकुमार गावित) ---------- विकासकामांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर आमदार डॉ. विजयकुमार गावित यांची नंदुरबारकरांना दिवाळी भेट सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. ६ : आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी प्रस्तावित केलेल्या नंदुरबार शहराच्या विविध वसाहतींमधील २३ विकासकामांसाठी सुमारे ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे विविध प्रभागातील कामांना चालना मिळणार असल्याने भाजपच्या नगरसेवकांनी आनंद व्यक्त केला आहे. नगरविकास विभागाच्या शासन निर्णयात म्हटले आहे की, ‘नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान’ या योजनेअंतर्गत नंदुरबार नगरपरिषदेला पाच कोटींचा निधी शासन निर्णयान्वये मंजूर केला आहे. सदर प्रकल्प खर्चाचा १०० टक्के हिस्सा राज्य शासनाचा राहणार आहे. कामाची कार्यान्वयीन यंत्रणा सर्वजनिक बांधकाम विभाग राहील, असेही आदेशात म्हटले आहे. आमदार डॉ. गावित यांनी मिळवून दिलेल्या या निधीमुळे नंदुरबार शहरातील विविध वसाहतींमधील सोयीसुविधा आणि विकास कामे पूर्णत्वास येणार आहेत. नंदुरबार नगरपालिका क्षेत्रातील व्यायाम शाळा बांधकाम करणे, नगर परिषदेच्या सभामंडपाचे बाधकाम करणे, शाळेचे गार्डन विकसीत करणे, सामाजिक सभागृह विकसीत करणे, नगर परिषदेचे सामाजिक सभागृह (डोम) बांधकाम करणे, मंदिराचे सभामंडप बांधणे, यासारख्या २३ कामांचा यात समावेश आहे. शहराला भरघोस निधी मिळाल्याने आमदार डॉ. विजयकुमार गावित, माजी खासदार डॉ. हीना गावित, भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित भाजपा नगरसेवकांनी आभार मानले आहेत.

Bageshwar Baba Controversial Statement Row : "ईशनिंदेला माफी नाही, राज्यात पाय ठेवू देणार नाही!"; प्रभू श्रीकृष्णावरील 'त्या' विधानावरून देशात मोठा भडका; दोन दिग्गज नेत्यांमध्ये थेट युद्ध

CBSE Date Sheet 2027: सीबीएसईच्या दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; बारावीची परीक्षा...

Nashik TCS Case: एमआयएम नेते इम्तियाज जलील अधिकृतपणे सहआरोपी; संजय शिरसाटांचा "त्याला तुरुंगात जावेच लागेल" असा थेट घणाघात

Captain Vaibhav Sooryavanshi : १५ व्या वर्षी वैभव सूर्यवंशी बनला टीमचा कॅप्टन! त्याच्या नेतृत्वाखाली बघा कोण कोण खेळणार, मॅच कधी व कुठे होणार?

India Visa Rules Major Change : भारतात राहण्यासाठी आता व्हिसा बंधनकारक! केंद्र सरकारकडून नियमांमध्ये मोठा बदल; 'या' ६ समुदायांवर होणार थेट परिणाम

SCROLL FOR NEXT