नाशिक

शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत जाहीर केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे आंदोलन

CD
NSK26H32735 नंदुरबार : निवासी जिल्हाधिकारी आशा संघवी यांना निवेदन देताना शिवसेना जिल्हाप्रमुख पंडित माळी. शेजारी डॉ. हेमंत शर्मा, सागर पाटील, रीना पाडवी, दिनेश सोनवणे, मन्नान गणी शिकलीकर, रमेश पाटील आदी. ----- मुख्यमंत्र्यांच्या नावाने जिल्हाधिकाऱ्यांकडे ५ हजार १ रुपये सुपूर्द --- शिवसेना (उबाठा) पक्षातर्फे तुटपुंजी मदत जाहीर केल्याने आंदोलन सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. १६ : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना, राज्य सरकारने शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. यातून सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केल्याच्या आरोप करीत शिवसेना (उबाठा) पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकऱ्यांतर्फे पाच हजार एक रुपयांची रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यासाठी निवासी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. पाच हजार रुपयांत मुख्यमंत्र्यांनी दिवाळी साजरी करून दाखवावी, असे आव्हान देऊन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी एक लाखांची मदत जाहीर करावी, अशी मागणी शिवसेनेने केली. नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. पाणीटंचाई, जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न आणि शेतीचे नुकसानामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांना पुरेशी आर्थिक मदत मिळणे अपेक्षित असताना, सरकारने अपुरी जाहीर केली आहे. दुष्काळाच्या झळा केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे, तर शेतमजूर, मोलमजुरी करणारे कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांनाही बसत आहेत. त्यामुळे शासनाने शेतकरी आणि कष्टकरी जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. खाद्यतेल, साखर आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यात वीजबिल भरण्यास उशीर झाल्यास वीजपुरवठा खंडित केला जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला. शेतकऱ्यांना अपेक्षित मदत न दिल्यास शिवसेनेतर्फे आंदोलन छेडण्यात येईल. नंदुरबार जिल्ह्यात मंत्र्यांना फिरू दिले जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला. जिल्हाप्रमुख पंडित माळी, उपजिल्हा प्रमुख डॉ. हेमंत शर्मा, युवासेना जिल्हाधिकारी सागर पाटील, महिला जिल्हा आघाडीप्रमुख रीना पाडवी, जिल्हा सचिव दिनेश सोनवणे, कार्याध्यक्ष मन्नान गणी शिकलीकर, तालुकाप्रमुख रमेश पाटील, युवासेना उपजिल्हाधिकारी दिनेश भोपे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष इम्तियाज कुरेशी, युवासेना सचिव अक्षय श्रीखंडे, खंडू माळी, भक्तवत्सल सोनार, संगीता माळी, दीपाली वाघ, जयश्री सोनवणे, भरत गुरव, निंबा पाटील, गोपाल राजपूत, जनक त्रिवेदी, संतोष पाटील, रिजवान शेख आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W VS ZIM W: संकटमोचक बनून आली दीप्ती शर्मा! झिम्बाब्वेविरुद्ध २७ धावांत ४ विकेट्स गमावल्यानंतरही भारताचा थरारक विजय

Bombay High Court Decision : महाराष्ट्रात दिवाळीत फटाके फोडण्यावर निर्बंध; मुंबई उच्च न्यायालयाचा अत्यंत मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय!

Delhi Protest High Voltage : "ज्ञानेश कुमारांना भारतरत्न द्या!"; सीजेपीच्या 'तिरंगा यात्रे'दरम्यान अभिजीत दिपकेंविरोधात घोषणाबाजी, 'मोदी-मोदी'च्या नाऱ्यांनी दणाणला परिसर

Albatya Galbatya 2.0 Drama : ‘अलबत्या गलबत्या’ने रचला इतिहास; सलग सात प्रयोगांचा ‘शिखर विश्वविक्रम’

Badnapur Drought : ‘पाच हजारांत दिवाळी कशी साजरी करायची? दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा आर्त सवाल; रामदास आठवले यांच्यासमोर शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

SCROLL FOR NEXT