फोटो : NSK26H31379
पिंपळोद : पावसाअभावी हिरवा चारा उपलब्ध नसल्याने पशुधनासाठी चाऱ्याची समस्या निर्माण झाली आहे.
-------------------
दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या
आर्थिक अडचणी वाढणार
पिंपळोद, ता. ५ : नंदुरबार तालुक्यातील लोय, घोड्यावद, तगाईपाडा, करंजवे, पिंपळोद, शेजवा, वेळावद परिसरात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने शेतकरी दुष्काळाला सामोरा जात आहे. अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे खरीप हंगामातील पिकांवर मोठा परिणाम झाला असून, शेतकरी चिंतेत आहे.
यंदा पावसाळ्यात सुरुवातीपासूनच पावसाचे सातत्य राहिले नाही. काही ठिकाणी झालेल्या तुरळक पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. अनेक ठिकाणी पिके पाण्याअभावी सुकण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. परिसरातील विहिरी, बोअरवेल तसेच लहान- मोठ्या जलस्रोतांच्या पातळीत घट झाली आहे. तर काही स्त्रोत आतापासूनच आटू लागले आहेत. पावसाअभावी आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांसमोर आर्थिक अडचणी वाढणार असून, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. प्रशासनाने परिसरातील पिकांचे तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन आतापासूनच नियोजन करावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.