नाशिक

नंदुरबार जिल्ह्यातील स्थलांतर रोखण्यासाठी रोजगारासह चारा, पाण्याचे नियोजनाचे निर्देश

CD
(पान १ ला मेन) -------------------------- नंदुरबार जिल्ह्यातील स्थलांतर रोखावे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे अधिकाऱ्यांना निर्देश सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. ७ : जिल्ह्यात यंदा अपेक्षेच्या तुलनेत पर्जन्यमान कमी झाल्याने दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजनांना गती द्यावी. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करावा. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत संभाव्य स्थलांतर रोखावे. पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध करून द्यावा. तसेच, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत नियोजन करावे, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. ----------------- पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी मंगळवारी (ता. ७) मुंबई येथून दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकरराव किर्वे, जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तर निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांच्यासह अन्य अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयातून सहभागी झाले होते. अक्राणी, तळोदा, नंदुरबार तालुक्यात सर्वात कमी पाऊस या वेळी जिल्ह्यातील पर्जन्यमान, अवर्षणप्रवण महसूल मंडळे, कोरड्या दिवसांची स्थिती, खरीप पिकांची पेरणी तसेच दुष्काळसदृश परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्ह्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान ८६०.४० मि.मी. असून, जून ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत ४२४.१० मिमी पाऊस झाला आहे. हे सरासरी वार्षिक पर्जन्यमानाच्या ४९.३० टक्के आहे. आजपर्यंत अपेक्षित ८२१.३० मिमी पर्जन्यमानाच्या तुलनेत ५१.६० टक्के पाऊस झाला आहे. अक्राणी, तळोदा आणि नंदुरबार तालुक्यांमध्ये पर्जन्यमानाची स्थिती विशेषतः कमी आहे. जिल्ह्यातील ३६ महसूल मंडळांपैकी ३१ मंडळांमध्ये २१ दिवसांपेक्षा अधिक कोरडे दिवस नोंदविण्यात आले आहेत. त्यामुळे पिकांची सद्यस्थिती, पिकांचे नुकसान आणि उपलब्ध पाणीसाठ्याच्या नियोजनावर सातत्याने लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. अपुऱ्या पावसामुळे पिकांवर झालेल्या परिणामाचा प्रत्यक्ष आढावा घेऊन नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत व त्याबाबतचा अहवाल विलंब न करता शासनास सादर करावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करावा दुष्काळसदृश परिस्थितीत ग्रामीण भागातील नागरिकांचे स्थलांतर होऊ नये यासाठी स्थानिक पातळीवर रोजगाराची कामे उपलब्ध करून द्यावीत. रोजगाराच्या मागणीनुसार आवश्यक कामांचे नियोजन करून ती तातडीने सुरू करण्याच्या सूचनाही या वेळी देण्यात आल्या. तसेच, पशुधनासाठी आवश्यक चारा उपलब्धतेचे नियोजन, चारा साठ्याची उपलब्धता आणि संभाव्य गरज याचा नियमित आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले. पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने व नियोजनबद्ध वापर करण्याबाबतही संबंधित यंत्रणांना सूचना देण्यात आल्या. दुष्काळसदृश परिस्थितीत प्रशासनाने संवेदनशीलतेने व तत्परतेने काम करून शेतकरी, पशुपालक आणि ग्रामीण जनतेला आवश्यक मदत वेळेत उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : संतप्त जमावाच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू ;शहरात पुन्हा झुंडबळी; चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याने संताप

Manwat Farmers: घरातील साहित्य विकले, शेती गहाण ठेवली; थकीत बिलांसाठी मानवतमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

प्रदीप पूर्णेकरांच्या घरी Jayant Patil दाखल! नेमकं काय म्हणाले?

MPSC protest Pune : पुण्यातील MPSC आंदोलनावर हायकोर्टाने सरकारला खडसावलं; 'विद्यार्थी समाजविघातक नाही...'

Dharashiv Sugarcane Farmers : ‘ऊसदराच्या बाबतीत उत्तर द्या’, ओमराजे, तानाजी सावंतांसह आमदार, खासदारांना थेट इशारा, धाराशिवचे शेतकरी संतप्त

SCROLL FOR NEXT