नाशिक

रोजगारासह जनावरांसाठी चाऱ्याचे नियोजन करावे

CD
(टुडे पान एक मेन) फोटो : NSK26H33855 नंदुरबार : आढावा बैठकीत बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ. शेजारी आमदार राजेश पाडवी, डॉ. मिताली सेठी, नमन गोयल, अश्‍विनी सानप, धनंजय गोगटे, आशा संघवी, लघीमा तिवारी, उपजिल्हाधिकारी उषाराणी देवगुणे-दहिकर. -------------- दुष्काळामुळे तीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान पालकमंत्री हसन मुश्रीफ : ३०० कोटींच्या नुकसानीचा अहवाल शासनाला सादर सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. २९ : दुष्काळामुळे जिल्ह्यातील दोन लाख ९५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, त्यापोटी ३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी राज्य शासन केंद्र शासनाकडे पाठपुरावा करेल. दुष्काळाच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी रोजगार, पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा, रोजगार हमीची कामे आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत या बाबींना प्राधान्य द्यावे, अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, पोलिस अधीक्षक अश्‍विनी सानप, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी, सहायक जिल्हाधिकारी लघीमा तिवारी, महाराष्ट्र रोजगार हमी (विकसित भारत- रोजगार व आजिविका हमी अभियान (ग्रामीण) उपजिल्हाधिकारी उषाराणी देवगुणे- दहिकर आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, दुष्काळी परिस्थितीत बळीराजाला धीर देण्यासाठी शासन आणि प्रशासनाने एकत्रित प्रयत्न करावे. शासनाने घेतलेल्या निर्णयांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावा. मदतीच्या प्रक्रियेत कोणतीही दिरंगाई होणार नाही, याची दक्षता घ्यावी. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वास त्यांना द्यावा. पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण व जलसंधारण यासाठी जलतारा, छोटे बंधारे तसेच, ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ यांसारखी कामे मोठ्या प्रमाणावर हाती घ्यावीत. पंचनामे व मदत वाटपात दिरंगाई नको दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याला पाच हजार रुपये अग्रिम मदत देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. ही मदत पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी यंत्रणेने दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांना जाहीर केलेली तातडीची आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यांत वेळेत जमा करण्यासाठी कार्यवाही करावी. कर्जमाफी व दुष्काळी मदतीच्या प्रक्रियेत समन्वय राखून संबंधित लाभार्थ्यांना मदतीचा लाभ मिळवून द्यावा. खासगी सावकराविरुद्ध कारवाई करावी. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. गावनिहाय पाणी उपलब्धता, टँकरची आवश्यकता, जनावरांसाठी चारा आणि रोजगार हमीच्या कामांचे नियोजन करावे. जलसंधारणाची कामे, गाळमुक्त धरण- गाळयुक्त शिवार, शेततळे, जलतारा, बंधारे दुरुस्तीची कामे करुन पाणीसाठा वाढविणाऱ्या उपाययोजनांनाही गती द्यावी. शेतकऱ्यांना अंखडीत वीज पुरवठा करावा. वीजपुरवठ्यातील अडचणी व दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत. शेतकऱ्यांना अंखडीत वीज पुरवठा करावा. जलजीवन मिशनची ७५ टक्क्यांपेक्षा अधिक कामे पूर्ण झालेल्या कामांसाठी निधीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. रोहयो कामातून स्थलांतर रोखावे नंदुरबार जिल्ह्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर मजूर उपलब्ध आहेत. बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये रोजगाराची कामे सुरू आहे. शेजारील राज्यांत मजुरांचे स्थलांतर होऊ नये, यासाठी त्यांना स्थानिक पातळीवर पुरेसा रोजगार उपलब्ध करून द्यावा. रोजगार हमी योजनेच्या कामांवर विशेष लक्ष द्यावे. निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांनी दुष्काळी उपाययोजनांची माहिती दिली. तसेच महाराष्ट्र रोजगार हमी योजना, पशुसंवर्धन विभाग,पाणीपुरवठा विभाग, मृद व जलसंधारण, लघु पाटबंधारे, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, कृषी विभाग, भूजल सर्वेक्षण या विभागाच्या प्रमुखांनी उपाय योजनांची माहिती सादर केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenakshi Shinde Resign: ठाण्यात मोठी घडामोड! प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरण; मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा

'ए' गरम पाणी पीत जा!’ भर मैदानात वैभव सूर्यवंशीला मिळाला खास सल्ला, VIDEO व्हायरल

Spain Train Crash: 'Minister Of Death' म्हणत उडाला संतापाचा भडका! ६८ बळींनंतर स्पेनमध्ये राजीनाम्यासाठी आंदोलन

Smile Day 2026: चेहऱ्यावर हसू, पण मनात दुःख? आनंदी दिसणं आणि खरोखर आनंदी असणं यात नेमका फरक काय?

प्रदीप पूर्णेकर हत्याकांडप्रकरणी ठाण्यात तणाव! शिंदेसेनेकडून जोरदार घोषणाबाजी; कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT