(पान ३ ला मेन)
फोटो :NSK26H33139
नंदुरबार : शहरात दसऱ्यानिमित्त झेंडूची फुले खरेदी करताना.
==============
फोटो : NSK26H33134
नंदुरबार : येथे दसऱ्यानिमित्त दुचाकी वाहनांच्या खरेदीसाठी राणा शोरूममध्ये झालेली गर्दी.
-------------------
दसऱ्यानिमित्त बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल
खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; वाहन खरेदीकडे नागरिकांचा कल
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. २० : दसरा सणाच्या पावन मुहूर्तावर नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या सणामुळे सोने- चांदी, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल आणि कपडे खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती.
दसऱ्याच्या पूर्वसंध्येलाच बाजारपेठ फुलली होती. सणाच्या मुहूर्तावर नवीन वाहन खरेदीकडे नागरिकांचा कल दिसून आला. दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या शो-रूम्समध्ये गेल्या महिनाभरापासून काही ग्राहकांनी बुकींग केली होती. दसऱ्याच्या दिवशी शेकडो ग्राहकांनी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची खरेदी केली. दुचाकी खरेदीसाठी महिला वर्गात अधिक उत्साह दिसून आला. त्याचप्रमाणे ट्रॅक्टर आणि व्यावसायिक वाहनांनाही चांगली मागणी राहिली. शहरात चारचाकी आणि दुचाकी वाहनविक्रीची १० ते १२ शोरूम आहेत. सर्वच ठिकाणी ग्राहकांची गदी दिसून आली.
दागिने खरेदीवर भर
सोने खरेदीसाठी दसऱ्याचा मुहूर्त अत्यंत पवित्र मानला जातो. नंदुरबारच्या सराफा बाजारात ग्राहकांचा उत्साह दिसून आला. दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. पारंपरिक दागिन्यांनाही प्राधान्य देण्यात आले. ग्राहकांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्या- चांदीला पसंती दिली.
इलेक्ट्रॉनिक्स, गृहउद्योग तेजीत
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर व्यापाऱ्यांनी विविध सवलती आणि फायनान्स ऑफर्स दिल्या होत्या. त्यामुळे या वस्तुंची खरेदी करण्यासाठी ग्राहक वर्गाची दुकानांमध्ये गर्दी होती. नवीन घरासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यावर गृहिणींचा भर दिसून आला.
कपडे आणि मिठाईची खरेदी
यासोबतच कपडे आणि मिठाई खरेदीला प्राधान्य देण्यात आले. पूजा साहित्यासह झेंडूची फुले, आपट्याची पाने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती. ग्रामीण भागातून लोक आपट्याच्या पानांच्या विक्रीसाठी शहरात दाखल झाले होते. झेंडूची फुले विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत दाखल झालेली होती. झेंडूची फुले ४० ते ५० रूपये किलो दराने विकली गेली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.