नाशिक

नंदुरबारात महाविकास आघाडीचा मोर्चा

CD
बदलते पान ------------- नंदुरबारात महाविकास आघाडीचा मोर्चा ज्ञानेशकुमार यांच्यावर कारवाईसाठी प्रशासनाला निवेदन सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. ९ : महाविकास आघाडीतील विविध घटक पक्षांतर्फे नंदुरबारात एसआयआरविरोधात मोर्चा काढण्यात आला. मतदार याद्यांचे विशेष पुनरीक्षण कार्यक्रमच्या (एसआयआर) माध्यमातून मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली. मोर्चानंतर जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की एसआयआर प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे वगळली जात आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी सहकारी निवडणूक आयुक्तांना विश्वासात न घेता निर्णय घेऊन मतदार मतदारांची नावे वगळण्याचे काम सुरू केले आहे. पश्चिम बंगालमध्ये अशाच पद्धतीने २२ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली असून बिहारमध्ये देखील लाखो नावे वगळण्यात आली आहेत. महाराष्ट्रात २०२४ च्या विधानसभा निवडणूकीत ४७ लाख मतांची वाढ झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडावी, अशी मागणी करण्यात आली. नंदुरबार शहरातील श्री. छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरापासून मोर्चाला सुरुवात झाली. अंधारे चौक, शास्त्री मार्केट, हाट दरवाजा मार्गे मोर्चा नेहरु पुतळ्याजवळ पोहोचल्यावर मोचार्चा समारोप करण्यात आला. मोर्चात महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी माजी मंत्री पद्माकर वळवी, राजेंद्रकुमार गावित, दिलीप नाईक, सी. के. पाडवी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक पटेल, शिवसेना (उबाठा) जिल्हाध्यक्ष अरुण चौधरी, पंडित माळी, युवा अध्यक्ष सागर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नीलेश पाटील यांच्यासह तिन्ही पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Rahul Gandhi Vote Theft : 'राष्ट्रपतींनी मतचोरीचे आरोप फेटाळले नाहीत, उलट मागितले पुरावे'; राहुल गांधींचा मोठा दावा, CEC ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याचीही केली मागणी

MPSC Student Agitation : पेपरफुटीचे पुरावे दिल्यामुळेच विद्यार्थ्यांवर खोटे गुन्हे; आंदोलकांचा पोलिसांवर आरोप

Pune News : मानेखाली इलेक्ट्रिक हॉट वॉटर बॅग ठेवून झोपला; आयटी अभियंता प्राणास मुकला, दोन दिवस फ्लॅटमध्ये पडून होता मृतदेह

Ganja Seized : उमरगा सीमेवर पोलीस अन् अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई; ३.२४ कोटींचा ६४२ किलो गांजा जप्त

INDIA Bloc Vijay Chowk Protest: 'इंडिया' आघाडीचे नेते राष्ट्रपती भवनात; विजय चौकात खासदारांचे ठिय्या आंदोलन

SCROLL FOR NEXT