(पान १ ला ॲंकर)
फोटो : NSK26H34154
नंदुरबार : उद्योजक मार्गदर्शन कार्यशाळेत महेंद्र पाटील, महेंद्र निळे, शीतल बोराडे, नालंदा निळे, महेंद्र मालवीय, सूरज महाजन, डॉ. तेजल चौधरी, डी. के. नेरकर, प्रा. प्रज्ञा मिस्त्री, अरुण धनेश्वर.
---------------
तरूणांनी उद्योग- व्यवसायाकडे वळावे
महेंद्र निळे : उद्योजक कार्यशाळेत उद्योग उभारणीवर मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १ : अनुसूचित जाती- जमातीतील तरुणांनी उद्योग व्यवसायाकडे वळण्याची गरज आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे व्यवसायासंबंधी संधीचा युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वेस्ट खानदेश दलित शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष महेंद्र निळे यांनी केले.
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील नवउद्योजकांना प्रोत्साहन देऊन त्यांना उद्योग व्यवसायाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी येथे एकदिवसीय मोफत उद्योजक कार्यशाळा उत्साहात झाली. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यशाळेत शासकीय योजनांची माहिती, उद्योग नोंदणी, कर्ज सुविधा, भांडवल उभारणी आणि व्यवसाय विस्ताराबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
नंदुरबार नियोजन समिती, नेक्स्टजेन चेंबर ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्री, एमएसएमई, एनएसआयसी आणि नॅशनल एससीएसटी हब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन उद्योजक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष महेंद्र पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी एनसीसीआय मुंबईच्या उपाध्यक्ष शीतल बोराडे, मंडळाच्या संचालिका नालंदा निळे, उद्योजक महेंद्र मालवीय, जिल्हा उद्योग केंद्राचे सूरज महाजन, डॉ. तेजल चौधरी, उद्योजक डी. के. नेरकर, प्रा. प्रज्ञा मिस्त्री, अरुण धनेश्वर आदी उपस्थित होते.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात सूरज महाजन यांनी केंद्र व राज्य शासनाच्या उद्योगविषयक योजनांची माहिती दिली. डॉ. तेजल चौधरी आणि डी. के. नेरकर यांनीही मार्गदर्शन केले. उद्योजक महेंद्र मालवीय यांनी मुद्रा योजना, स्टँडअप इंडिया योजना, बँक कर्ज सुविधा आणि नॅशनल एससी-एसटी हबच्या माध्यमातून मिळणाऱ्या विशेष सवलतींची माहिती दिली. प्रा. प्रज्ञा मिस्त्री यांनी जीईएम पोर्टलविषयी, तर अरुण धनेश्वर यांनी एनसीसीआय संस्थेच्या कार्याची माहिती दिली. शीतल बोराडे यांनी विविध शासकीय उद्योगविषयक योजनांबाबत मार्गदर्शन केले. नालंदा निळे यांनी महिला आणि युवकांनी स्वतःचा उद्योग सुरू करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याचे आवाहन केले. शीतल बोराडे यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधण्यात आला.
सतीश मंगळे यांनी सूत्रसंचालन केले. शीतल बोराडे यांनी आभार मानले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी एनसीसीआयचे धुळे- नंदुरबार समन्वयक मितेश निळे, अरुण धनेश्वर, महेंद्र पाटील, मुकेश ठाकरे, प्रतीक पाटील आणि विनोद पाटील यांनी परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.