फोटो : NSK26H33924
नंदुरबार : उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे यांना निवेदन देताना भारतीय आदिवासी स्वाभिमानी सेनेचे पदाधिकारी.
----------------------------
वनहक्क पट्टेदार शेतकरी फार्मर आयडीपासून वंचित
भारतीय आदिवासी स्वाभिमानी सेनेचा आंदोलनाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. ३० : जिल्ह्यातील असंख्य वनहक्क पट्टेदार आदिवासी शेतकरी प्रलंबित फार्मर आयडी नोंदणीपासून वंचित आहेत. यासाठी शेतकरी शासकीय कार्यालयांमध्ये चकरा मारीत आहेत. फार्मर आयडी नोंदणीअभावी शेतकरी दुष्काळी मदत व इतर शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहू शकतात. प्रशासनाने याकडे गांभिर्याने लक्ष पुरवावे अन्यथा, संबंधित कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा भारतीय आदिवासी स्वाभिमानी सेनेने दिला आहे. याबाबतचे निवेदन उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, अनेक वनहक्क पट्टेदार शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र, तरीही त्यांना फार्मर आयडी मिळालेला नाही. त्यामुळे पीककर्ज, कर्जमाफी, दुष्काळी मदत व इतर शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती या शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना वारंवार कार्यालयांच्या चकरा माराव्या लागत आहेत. प्रलंबित प्रकरणांची तालुकानिहाय यादी तयार करून ती तातडीने निकाली काढावी. यासाठी प्रत्येक तालुक्यात नोडल अधिकारी नियुक्त करून शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण करावे.पात्र शेतकरी केवळ फार्मर आयडीअभावी शासकीय लाभांपासून वंचित राहू नयेत. प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास धडक मोर्चा काढून आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला.
या वेळी भारतीय आदिवासी स्वाभिमानी सेनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष पंडित तडवी, जिल्हाध्यक्ष अनिल ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष दिनेश नाईक, तालुकाध्यक्ष काळूसिंग भिल, अर्जुन पवार, दिला भिल, कांड्या तडवी, बाबुराव पाडवी आणि अरविंद नाईक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.