नाशिक

अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

CD
(सेकंड मेन) ------ दोन महिन्यांत जिल्ह्यात २६ लाखांचा साठा जप्त दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. ४ : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने नंदुरबार जिल्ह्यातील मिठाई व नमकीन विक्री करणाऱ्या आस्थापनांची विशेष तपासणी मोहीम राबवली. १ सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या दोन महिन्यांच्या कालावधीत केलेल्या या कारवाईत भेसळयुक्त असल्याचा संशय असलेला २६ लाख ४१ हजार ९९ रुपये किमतीचा एकूण तीन हजार ४८० किलो माल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्त सपना गोडसे- पाटील यांनी दिली. या कालावधीत जिल्ह्यातील एकूण ६७ पेढ्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी ३१ पेढ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, ९ पेढ्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच, आठ पेढ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, तपासणीसाठी एकूण ८२ नमुने घेण्यात आले आहेत. जप्त केलेल्या साठ्यामध्ये प्रामुख्याने मसाले, खाद्यतेल, नमकीन आणि मिठाईचा समावेश आहे. या पदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार संबंधितांविरुद्ध पुढील कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई नंदुरबार कार्यालयाच्या सहायक आयुक्त श्रीमती सपना गोडसे- पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी तुषार देवरे, सुरेंद्र डौले आणि संकेत सदाफुले यांनी पार पाडली. अन्न पदार्थांमध्ये भेसळ न करण्याचे आणि कोणत्याही प्रकारचा सिंथेटिक कलर वापरण्यात येवू नये. मिठाईमध्ये रंगाचे प्रमाण मर्यादित असावे, तसेच हॉटेल व्यावसायिकांनी तळण्यासाठी वारंवार तेच तेल वापरू नये. नियमांचे उल्लंघन झाल्यास दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच, दिवाळीनिमित्त स्टॉलवर विक्री करणाऱ्या सर्व विक्रेत्यांना अन्न नोंदणी किंवा परवाना घेणे बंधनकारक असल्याचेप्र शासनाकडून स्पष्ट केले आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रकारची शंका किंवा तक्रार असल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या नंदुरबार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

Supreme Court: मुख्य निवडणूक आयुक्तांना मिळणारे अमर्याद कायदेशीर संरक्षण आता जाणार की राहणार? सर्वोच्च न्यायालयाची...

WPL 2027 चे वेळापत्रक जाहीर! MI vs RCB सामना कधी? मुंबई अन् बडोद्यात रंगाणार सामने

Ambegaon Farmers: आंबेगावातील ११०१ शेतकऱ्यांना मोठा आधार! २ हजार ९५ किलो देशी बियाण्यांचे मोफत वाटप

Pali News: पालीकरांचा नगरपंचायतीवर संघर्ष मोर्चा! आधी विकासाचा हिशेब द्या, मगच घरपट्टी वाढवा; नागरिक आक्रमक

Asaduddin Owaisi: 'एका अब्दुलने मिशीगन जिंकले; आता दुसऱ्याने यूपीत कमाल करून दाखवावी!' ओवैसींना म्हणायचेय काय?

SCROLL FOR NEXT