Crime esakal
नाशिक

Nashik Crime : ओढणीच्या सहाय्याने प्रियसीचा गळा आवळून खून; 6 तासांतच प्रियकर ताब्यात

प्रियकराने ओढणीच्या सहाय्याने प्रेयसीचा गळा आवळून खून केल्याची घटना सोमवारी (ता. २२) मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास घडली.

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी : प्रेयसी दुसऱ्याबरोबर मोबाईलवरून चॅटिंग करीत असल्याचा राग येऊन संतप्त प्रियकराने ओढणीच्या सहाय्याने प्रेयसीचा गळा आवळून खून केल्याची घटना सोमवारी (ता. २२) मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास घडली.

त्यानंतर त्याने मित्राच्या मदतीने मृतदेह अंबड येथून चारचाकीतून रासबिहारी लिंकरोड येथील मोकळ्या जागेत आणून टाकला. मंगळवारी (ता. २३) सकाळी प्रियंका विरजी वसावे (वय १९, मु. पाटबारा, पो. जमाना, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार) हिचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे फिरवत अवघ्या सहा तासांत संशयित प्रियकरास शिताफीने बेड्या ठोकल्या. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (nandurbar Girlfriend strangled to death Within 6 hours lover in custody Nashik Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर चिवदास तडवी (२१, मूळ रा. नंदुरबार, हल्ली राहणार, माऊलीनगर, अंबड, नाशिक) असे संशयित प्रियकराचे नाव आहे. प्रियंका सध्या छत्रपती संभाजीनगर नाक्यावरील एका परिचारिका महाविद्यालयात परिचारिकेचे शिक्षण घेत होती.

प्रियंका व सागर यांची जुनी मैत्री होती. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले होते. सोमवारी दुपारी प्रियंका अंबड येथे राहत असलेल्या सागरच्या घरी सायंकाळी गेली होती.

रात्री एक ते दीडच्या सुमारास प्रियंका दुसऱ्या कोणाशी मोबाईल फोनवर चॅटिंग करीत असल्याचा संशय सागरला आला. याच कारणावरून दोघांमध्ये भांडण झाले. यात संतप्त झालेल्या सागरने प्रियंकाचा ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून खून केला.

यानंतर भानावर आलेल्या सागरने आपल्या मित्राच्या मदतीने प्रियंकाचा मृतदेह चारचाकीतून उड्डाणपूलमार्गे बळी मंदिर येथून रासबिहारी लिंक रोडवरील मिरद्वार लॉन्सशेजारी मोकळ्या जागेत फेकून दिला.

मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास येथून जाणाऱ्या एका नागरिकास युवती मृतावस्थेत असल्याचे आढळून आले. याची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर लागलीच पंचवटी पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय कार्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी पथके रवाना करण्यात आली.

हवालदार कैलास शिंदे व पोलिस नाईक संदीप मालसाने यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे व तांत्रिक विश्लेषण करून ते संशयित सागर तडवी याच्या अंबड येथील घरी पोहोचले.

पोलिसी खाक्या दाखविताच त्याने हे कृत्य केल्याची कबुली दिली. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी बजावली कामगिरी

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पंचवटी विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त नितीन जाधव, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मिथुन परदेशी, रोहित केदार, हवालदार सागर कुलकर्णी, राजेश सोळसे, अनिल गुंबाडे, दीपक नाईक, कैलास शिंदे, पोलिस नाईक नीलेश भोईर, संदीप मालसाने, घनश्‍याम महाले, वैभव परदेशी, नितीन पवार, गोरख साबळे, श्रीकांत साळवे यांनी संयुक्तिकरीत्या केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT