(टूडे पान एक मेन लिड)
फोटो : NSK26H34652/NSK26H34653
नंदुरबार : नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेस उपस्थित नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी, उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, मुख्याधिकारी राहुल वाघ. दुसऱ्या छायाचित्रात प्रश्न उपस्थित करताना विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी.
---------------------
नंदुरबार पालिकेच्या सभेत १५ विषयांना मंजुरी
पिंजारी विहीर भाड्याने देण्यास भाजपचा विरोध; दुष्काळामुळे नागरिकांसाठी खुली ठेवण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. ६ : येथील नगरपालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता. ६) लोकनेते माणिकरावजी गावीत सभागृहात झाली. सभेत शहराच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. विषय पत्रिकेवरील १६ पैकी १५ विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. विषय क्रमांक १४ ला भाजपचे नगरसेवक व विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी यांनी विरोध दर्शविला.सभेच्या अध्यक्षस्थानी रत्ना रघुवंशी होत्या. या वेळी उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, मुख्याधिकारी राहूल वाघ उपस्थित होते.
सभेच्या विषयपत्रिकेत शहरातील मदनमोहन इंडस्ट्रियल अभिन्यास, झुलेलाल नगर आणि माणिक नगर येथील खुल्या जागांवर उद्यान, सामाजिक सभागृह, डोम आणि हॉल विकसित करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक सभागृह उपलब्ध करणे, शहरातील रस्त्यांची कामे विकास आराखड्यानुसार करण्यासाठी संबंधित यंत्रणांना प्रस्ताव देणे, सेंद्रिय शेती उत्पादकांना विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देणे, कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प उभारणे तसेच नगरोत्थान महाअभियानांतर्गत विकास कामांसाठी निधीची मागणी करणे आदी महत्त्वाच्या विषयांचा समावेश होता. शहराच्या मंजूर विकास योजनेतील आरक्षण क्रमांक १५ अर्थात स्मशानभूमीच्या आरक्षणाबाबतचा विषय क्रमांक १४ चर्चेला आला असता भाजपसह विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी यांनी त्याला विरोध केला.
पिंजारी विहिरी भाड्याने देण्यास विरोध
पिंजारी विहिरीलगत असलेल्या बंद पंपहाऊसच्या अंदाजे ५ बाय १.८० मीटर जागेच्या भाडेप्रकरणावरून यापूर्वी विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. स्थायी समितीचा ठराव आधी करण्यात आला. त्यानंतर व्यावसायिक भाडेकरारासाठी निविदा जाहिरात प्रसिद्ध झाली. त्यामुळे आधी ठराव आणि नंतर जाहिरात कशासाठी? असा सवाल चौधरी यांनी उपस्थित केला. या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणि नियमांचे पालन झाले आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, पिंजारी विहीर नगरपरिषदेने स्वतःच्या ताब्यात ठेवावी. ती कोणालाही भाड्याने देऊ नये, अशी मागणी त्यांनी सभेत केली. दुष्काळी परिस्थितीत या विहिरीतील पाणी शहरातील नागरिकांसाठी खुली करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. विहिरीसंदर्भात करण्यात आलेला ठराव रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली.
----------
चौकट---
फोटो : NSK26H34654
नंदुरबार : सभेत मास्क लावून बसलेले विरोधक.
--------
नगरसेवकांची मास्क लावून उपस्थिती
शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्याने नागरिकांना श्वसनाचा त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विरोधी पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी मास्क लावून सभेला उपस्थिती लावली. शहरातील रस्त्यांची स्वच्छता, धुळीचे नियंत्रण आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न प्रशासनाने गांभीर्याने घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. या वेळी पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, कुणाल वसावे, बांधकाम सभापती देवेंद्र जैन, दीपक दिघे, गटनेते आनंदा माळी, नगरसेवक पंकज चौधरी, रेखा प्रविण चौधरी, निता सतीश मराठे, सारिका लक्ष्मण माळी, शोभा सुरेश चौधरी, सुषमा धर्मेश गावित आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.