नाशिक

शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी २५ ला सेंद्रिय महोत्सव

CD
(टुडे पान एक ॲन्करसाठी) फोटो : NSK26H33006 नंदुरबार : सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून उत्पादनांची माहिती घेतांना ॲड. राम रघुवंशी ------------- नंदुरबारात २५ ला सेंद्रिय महोत्सवाचे आयोजन ॲड. राम रघुवंशी यांची संकल्पना; शेतकरी, बचतगटांना ग्राहकांशी जोडणारा उपक्रम सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. २० : सेंद्रिय शेती करणारे शेतकरी, सेंद्रिय उत्पादने तयार करणारे महिला बचतगट आणि ग्राहकांना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी रविवारी (ता. २५) येथील जी. टी. पी. कॉलेज मैदानावर नंदुरबार सेंद्रिय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक सेंद्रिय उत्पादकांना बाजारपेठ उपलब्ध करणे, ग्राहकांना सेंद्रिय उत्पादनांची माहिती देणे व थेट खरेदीची संधी उपलब्ध करून देणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी यांच्या पुढाकारातून हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. अनेक नागरिक दैनंदिन आहारात सेंद्रिय उत्पादनांना प्राधान्य देतात. मात्र, उत्पादने कुठे मिळतात, ती कोण तयार करते आणि थेट उत्पादकांकडून ती कशी खरेदी करावीत, याची माहिती उपलब्ध होत नाही. दुसरीकडे, शेतकरी आणि महिला बचत गटांना योग्य बाजारपेठ मिळवताना अडचणी येतात. उत्पादक आणि ग्राहक यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना मिळणार व्यासपीठ या महोत्सवात सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना उत्पादने नागरिकांपर्यंत पोहचविण्याची संधी मिळणार आहे. सेंद्रिय खाद्यपदार्थ आणि इतर उत्पादने तयार करणाऱ्या महिला बचत गटांच्या उत्पादनांची ओळख होणार आहे. अनेक महिला बचत गट विविध खाद्यपदार्थ आणि स्थानिक उत्पादने तयार करतात. मात्र, पुरेशी बाजारपेठ नसल्याने व्यवसाय वाढीला मर्यादा येतात. या महोत्सवामुळे बचत गटांना ग्राहकांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. ग्राहकांना सेंद्रिय उत्पादनांची माहिती सेंद्रिय उत्पादने खरेदी करू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी हा महोत्सव उपयुक्त ठरणार आहे. नागरिकांना विविध उत्पादकांची उत्पादने पाहता येतील. माहिती घेता येईल आणि थेट खरेदी करता येईल. उत्पादकांना बाजारपेठ आणि ग्राहकांना सेंद्रिय उत्पादनांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार असल्याने ग्राहकवर्ग वाढण्यास मदत होऊ शकते. ---------- बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद ॲड. राम रघुवंशी यांनी शेतावर जाऊन सेंद्रिय शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली. सेंद्रिय पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रयत्न आणि त्यांच्या उत्पादनांविषयी माहिती जाणून घेण्यात आली. सेंद्रिय महोत्सवाला भेट देऊन शेतकरी, महिला बचतगट आणि स्थानिक उत्पादकांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजक ॲड. राम चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MBBSनंतर IPS झाले, पुढे एक वर्षात IAS बनले; आता राज्यातून केंद्रात मोठी जबाबदारी, २ अधिकाऱ्यांची बदली

ना कोणता आजार, ना प्रकृतीची तक्रार! गरबा खेळताना ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू; छातीत अचानक कळ आली अन्...

Pradeep Purnekar Case: टल्ली, पपलूच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ, गुन्ह्यातील शस्त्रे, हेल्मेटचा शोध; तपासातील गोपनीय नोंदीने चर्चेला उधाण

Dussehra 2026: दसऱ्याला सोनं म्हणून आपट्याचीच पानं का देतात? राजा रघु आणि कुबेराची ही पौराणिक कथा जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : शिक्षक व पदवीधर निवडणुकीसाठी मतदानाची सवलत; शासकीय कर्मचाऱ्यांना भरपगारी रजा!

SCROLL FOR NEXT