नाशिक

नंदुरबारात महायुतीत फुटू लागले स्वबळाचे फटाके!

CD
(टुडे पान २ ॲन्कर) फोटो : NSK26H34460 (आमदार चंद्रकांत रघुवंशी) फोटो : NSK26H34463 (डॉ. हीना गावित) फोटो : NSK26H34464 (डॉ. अभिजित मोरे) ------- नंदुरबारच्या राजकारणात स्वबळाचे फटाके! महायुतीतील नेत्यांच्या भूमिकेमुळे राजकारण तापले विलास पवार : सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. ४ : महायुतीच्या घटक पक्षातील नेते स्वबळावर लढण्याची भाषा करीत असल्याने ऐन दिवाळीत नंदुरबार जिल्ह्यात राजकीय फटाके फुटू लागले आहेत. ‘राज्यात सत्तेवर एकत्र आणि जिल्ह्यात निवडणुका स्वतंत्र’ हा फार्म्युला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राबविला जाण्याची शक्यता गृहीत धरून सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्र्वभूमिवर आरोप- प्रत्यारोपांमुळे जिल्ह्याचे राजकारण पेटले आहे. महायुतीतीचे घटक पक्ष असलेल्या महायुतीमध्ये नंदुरबारात सध्या काहीही आलबेल दिसत नाहीत. सण- उत्सव आणि सांस्कृतीक कार्यक्रम सोडले तर इतर कोणत्याही राजकीय व्यासपिठावर महायुतीचे नेते एकत्र येतांना दिसून येत नाहीत. भाजपतर्फे माजी खासदार डॉ. हीना गावित यांनी जिल्हा परिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून, गावपातळीवर दौरे, मेळावे सुरू केले आहेत. माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांची जनजाती आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करून भाजपने बळ दिले आहे. माजीमंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा कुमुदीनी गावित यांच्या मार्गदर्शनाखाली गावित भगिनींनी ग्रामीण भागात दौरे सुरू केले आहेत. दुसरीकडे शिवसेना पक्षाचे नेते आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनीही जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असलेले त्यांचे सुपूत्र ॲड. राम रघुवंशी यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. आता पुन्हा उपाध्यक्ष पदाची सुत्रे आपल्याकडे असावीत, यासाठी रघुवंशींनी कंबर कसली आहे. महायुतीचाच घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांनीही ‘पक्षाने आदेश दिल्यास जिल्हा परिषदेची निवडणुक स्वबळावर लढवू’ अशी घोषणा केली आहे. महायुतीतील प्रमुख नेत्यांची भूमिका पाहता हे मित्र पक्ष एकमेकांच्या विरोधात लढण्याच्या तयारीत आहेत. ‘जिल्ह्यात भाजपची मस्ती अद्याप जिरलेली नाही,’ असे सांगून आमदार रघुवंशींनी मित्रपक्षाला डिवचले आहे. तर ‘जगातील सर्वात मोठ्या पक्षावर बोलताना आमदार रघुवंशी यांनी भान राखावे’ अशा शब्दात माजी खासदार डॉ. हीना गावित यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नंदुरबार जिल्ह्यात भाजपचे दोन, शिवसेना पक्षाचे दोन आणि कॉंग्रेसचा एक आमदार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा एकही आमदार नाही. राष्ट्रवादीकडे आमदार नसला तरी हसन मुश्रीफ यांच्या रूपाने जिल्ह्याचे पालकमंत्री पद राष्ट्रवादीकडे आहे. काही दिवसांपूर्वी निधीच्या कारणातून आरोप- प्रत्यारोप सुरू झाले होते. मंत्री उदय सामंत आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत नंदुरबारला झालेल्या मेळाव्यात आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना रडू कोसळले होते. विकासकामांना निधी मिळत नसल्याचा आरोप करून रघुवंशींनी पालकमंत्र्यांवर निशाणा साधला होता. --------- शहाद्याच्या निवडणुकीकडे लक्ष तीच परिस्थिती शहादा पालिकेच्या नगराध्यक्षांवर आली होती. पालिकेला निधी दिला जात नसल्याचा आरोप करीत अभिजित पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले होते. येणाऱ्या निवडणुकीत महायुती एकमेकांसमोर लढणार की, वरिष्ठांच्या आदेशानंतर स्वबळाची तलवार म्यान करणार, हे लवकरच कळेल. मात्र, ऐन दिवाळीत महायुतीने स्वबळाचे फटाके फोडण्यास सुरूवात केली आहे.

Supreme Court: मुख्य निवडणूक आयुक्तांना मिळणारे अमर्याद कायदेशीर संरक्षण आता जाणार की राहणार? सर्वोच्च न्यायालयाची...

WPL 2027 चे वेळापत्रक जाहीर! MI vs RCB सामना कधी? मुंबई अन् बडोद्यात रंगाणार सामने

Ambegaon Farmers: आंबेगावातील ११०१ शेतकऱ्यांना मोठा आधार! २ हजार ९५ किलो देशी बियाण्यांचे मोफत वाटप

Pali News: पालीकरांचा नगरपंचायतीवर संघर्ष मोर्चा! आधी विकासाचा हिशेब द्या, मगच घरपट्टी वाढवा; नागरिक आक्रमक

Asaduddin Owaisi: 'एका अब्दुलने मिशीगन जिंकले; आता दुसऱ्याने यूपीत कमाल करून दाखवावी!' ओवैसींना म्हणायचेय काय?

SCROLL FOR NEXT