(पान १ ला मेन)
NSK26H33962
प्रकाशा : जिल्हा परिषदेच्या कन्याशाळेच्या भेटीप्रसंगी उपस्थित मुख्यमंत्री सचिवालयाचे उपसचिव अजित बाविस्कर, कक्ष अधिकारी बिपीन कळसकर, सौरभ नेवाळकर, ओमकार देशमुख, भानुदास रोकडे आदी.
----------------
मुख्यमंत्री सचिवालयातर्फे शाळांची तपासणी
प्रकाशा कन्याशाळेतील सुविधांचा पथकाने घेतला आढावा
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. ३० : विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, अध्ययन निष्पत्ती आणि शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय शैक्षणिक उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री सचिवालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक गुरुवारी (ता. २९) जिल्ह्यात दाखल झाले. पथकाने प्रकाशा (ता. शहादा) येथील जिल्हा परिषद कन्या शाळा व शामनगर शाळेला भेट देऊन शाळेतील शैक्षणिक, भौतिक सुविधांची पाहणी केली. विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर, शाळेतील पायाभूत सुविधा आदी बाबींचा आढावा घेतला. शुक्रवारी (ता. ३०) देखील पथकाने शाळांची पाहणी केली.
---------
मुख्यमंत्री सचिवालयातील चार अधिकाऱ्यांचे पथक नंदुरबार जिल्हा अभ्यास दौऱ्यावर आले आहे. प्रकाशा येथील शाळेच्या भेटीत अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. भाषा, गणित, इंग्रजी पेटीचा वापर, निपुण महाराष्ट्र कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसह विद्यार्थ्यांचे वाचन, लेखन, अध्ययन क्षमता आणि शैक्षणिक प्रगतीची पडताळणी केली. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. विद्यार्थ्यांची शैक्षणिक आकलन क्षमता पाहून समाधान व्यक्त केले. अप्रगत विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्तेसाठी उपाययोजना, मार्गदर्शन, शैक्षणिक साहित्याचा वापर, विद्यार्थी वाचनालय, ई- लर्निंग व डिजिटल शैक्षणिक साहित्य याबाबत माहिती घेतली. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नांचा आढावा घेण्यात आला.
या वेळी जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, शहादा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी डी. डी. राजपूत, अक्कलकुव्याचे शिक्षण विस्तार अधिकारी सुनील तावडे, शेखर धनगर, प्रकाशा केंद्राचे केंद्रप्रमुख मनोज पिंजारी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोद शिंदे उपस्थित होते. मुख्याध्यापक रवींद्र पाटील, शिक्षक गोपाल गावित, शिक्षिका प्रियंका पाटील, नूतन पाटील यांनी शाळेतील शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली.
----------
पोषण आहाराची पाहणी
शाळेतील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहांची स्थिती, परिसर स्वच्छता, शालेय पोषण आहार, मुलींना दिले जाणारे गणवेश या बाबींची तपासणी पथकाने केली. शाळेतील स्वच्छ, सुरक्षित, अनुकूल वातावरण, शैक्षणिक साधनांचा उपयोग आणि शासन योजनांची अंमलबजावणी यावर लक्ष केंद्रित केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबाबत अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
--------
पथकात या अधिकाऱ्यांचा समावेश
पथकात उपसचिव अजित बाविस्कर, कक्ष अधिकारी बिपीन कळसकर, सल्लागार सौरभ नेवाळकर, समन्वयक ओमकार देशमुख या चार अधिकाऱ्यांचा समावेश आहे. नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्यविषयक समस्यांचा पथक अभ्यास करणार आहे. त्याचप्रमाणे शिक्षण, आदिवासी विकास आणि महिला व बालविकास या विभागातील अडचणी समजून घेणार आहेत. आपल्या अभ्यास दौऱ्यात पथकातील अधिकारी वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देणार असून, कर्मचारी, अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. ३१ ऑक्टोबरपर्यंत पथक जिल्ह्यात असून, या अभ्यास दौऱ्याचा अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.