फोटो : NSK26H33903
नंदुरबार : स्वत:ला दोराने बांधून घेऊन ग्रामस्थांसह पंचायत समितीत आंदोलन करताना प्रमोद पाटील.
-------------------
ग्रामसेवक नसल्याने स्वतःलाच दोरखंडाने बांधले
सैताणे ग्रामस्थांचे पंचायत समितीत आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. २९ : गेल्या तीन महिन्यांपासून ग्रामसेवक नसल्याने नंदुरबार तालुक्यातील सैताणे येथे अनेक कामे रखडली आहेत. विविध दाखले मिळविण्यासाठी वारंवार चकरा माराव्या लागत आहे. याच्या निषेधार्थ ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांतर्फे येथील पंचायत समितीत आंदोलन केले. या वेळी ग्रामस्थ प्रमोद पाटील यांनी स्वतःला दोरखंडाने बांधून गटविकास अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले.
सैताणे येथे गेल्या १०० दिवसांपासून ग्रामसेवक नसल्याने गावात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. ग्रामसेवकाअभावी विविध कागदपत्रे, दाखले मिळत नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांना फेऱ्या माराव्या लागत आहेत. जन्म- मृत्यू नोंदणीची कामे रखडली आहेत. या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सैताने येथील ग्रामस्थ प्रमोद पाटील यांनी काही ग्रामस्थांसह नंदुरबार पंचायत समिती कार्यालयात आंदोलन केले. आंदोलन साध्या पद्धतीने करावे, यासाठी पोलिसांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रमोद पाटील आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. या वेळी त्यांनी स्वतःला दोरखंडाने बांधून घेतले होते. आंदोलनाच्या वेळी हातात दोन लाकडी काठ्या घेतल्या होत्या. अशाच अवस्थेत त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. ग्रामसेवकाअभावी गावातील कामे होत नसल्याने गावकरी वैतागलेआहेत. पण, प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही, असा आरोप या वेळी आंदोलकांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.