नाशिक

सोसायटी सदस्यत्वावरुन उपोषण

CD
NSK26H34512 चांगदेव : विविध कार्यकारी संस्थेसमोर उपोषणास बसलेले ज्येष्ठ नागरिक नारायण चौधरी. ----- सदस्यत्व रद्दविरोधात ज्येष्ठ नागरिकाचे उपोषण उपशीर्षक चांगदेव वि.का. संस्थेतील प्रकार; यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे संताप सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ४ : चांगदेव (ता. मुक्ताईनगर) विविध कार्यकारी संस्थेचे सदस्याचे सदस्यत्व वर्षभरापूर्वी रद्द केल्यामुळे त्याविरोधात दाद मागण्यासाठी ९४ व्या वर्षी ज्येष्ठ नागरिकास सोसायटीसमोर उपोषणाला बसले आहेत. विशेष म्हणजे उपोषणकर्त्यांनी राज्य व केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपत कधी काळी जिल्हा संघटक म्हणून सेवा केली आहे. नारायण विश्‍वनाथ चौधरी हे नाव अलीकडच्या भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांना कदाचित माहिती नसावे, पण जनसंघ आणि भाजपच्या सुरुवातीच्या काळात या व्यक्तीने जळगाव जिल्ह्यात संघटक म्हणून काम करताना पक्षासाठी आयुष्य वेचले आहे. चांगदेव येथील श्री. चौधरींचे सध्याचे वय ९४. या वयात त्यांना चांगदेव वि.का. सोसायटीच्या त्यांच्या सदस्यत्वासाठी उपोषण करावे लागतेय. त्यांनी यासंदर्भात सहकारी संस्थांचे मुक्ताईनगर तालुका निबंधकांना निवेदन दिले असून, त्यात वर्षभरापूर्वी आयत्या वेळच्या विषयानुसार त्यांचे सदस्यत्व बेकायदेशीरपणे रद्द करण्यात आले. त्याविरोधात त्यांनी जिल्हा निबंधकांकडे तक्रार केली, पुण्याला सहकार संचालक, तसेच मुख्यमंत्र्यांच्या पोर्टलवरही त्यांच्या नातवाने तक्रार केली. जिल्हा निबंधकांनी त्यांना बेकायदेशीर ठरावाद्वारे सदस्यत्व रद्द केल्याचे कळवूनही संस्थेचे सचिव त्यांना सदस्य मानत नाहीत. त्यामुळे त्यांना पीककर्जही मिळत नसून, संस्थेकडे त्यांचे शेअर्स जमा आहे. मात्र, शेतीवर संस्थेचा बोजाही आहे, असे निवेदनात म्हटले आहे. यंत्रणेविरोधात उपोषण तालुका निबंधक आणि सहकार विभागाच्या कारभाराविरोधात आणि न्याय मिळत नसल्याने श्री. चौधरी चांगदेव वि.का. संस्थेसमोर उपोषणाला बसले आहेत. मात्र, त्यांच्या उपोषणाची सहकार विभागाने दखल घेतलेली नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे. --- कोट यासंदर्भात आपण स्वत: तालुका निबंधक शेवाळे यांच्याशी चर्चा केली. नारायण चौधरी यांच्या सदस्यत्व रद्दच्या ठरावाला तालुका निबंधकांची मान्यता नसल्याने ते अद्याप संस्थेचे सभासद असून, त्यांना त्यासंबंधी पत्र देण्याचे आपण तालुका निबंधकांना सांगितले आहे. मात्र, ते बाहेरगावी असल्याने पत्र देऊ शकले नाही. - महेश गायकवाड, जिल्हा निबंधक, सहकारी संस्था, जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Sanatan Martand Award : वाराणसी येथील 'संस्कृती संसद २०२६' मध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वोच्च 'सनातन मार्तंड' पुरस्कार प्रदान

Sharad Pawar Breach Candy Hospital : पुण्यात उपचारानंतर शरद पवार मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात; कार्यकर्त्यांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

Latest Marathi News Live Update : ५ हजारांत दिवाळी साजरी करून दाखवाच! हर्षवर्धन सपकाळांचे मंत्र्यांना खुले आव्हान

Success Story: घरची परिस्थिती जेमतेम, पण शिक्षणाची जिद्द कायम; राजश्री साळवेची भूमी अभिलेख विभागात निवड, कष्ट अन् जिद्दीला यशाची साथ

Sugar Prices: सर्वसामान्यांची दिवाळी कडू! सणाच्या तोंडावरच साखरेचे दर वाढले; सध्याचे भाव काय?

SCROLL FOR NEXT