Legislative Assembly Vice President Narahari Jirwal along with female artistes honored at the Women's Artist Awards Ceremony held at Swarnima Cultural Auditorium esakal
नाशिक

Narhari Zirwal : कलावंतांनी संघटित होणे काळाची गरज : नरहरी झिरवाळ

सकाळ वृत्तसेवा

वणी (जि. नाशिक) : महाराष्ट्रात लाखो कलावंत -साहित्यिक-कीर्तनकार हे आपल्या शासकीय योजनांपासून वंचित राहतात. काही अंशी कलावंतांना राज्य सरकारने जाहीर केलेल्या योजनेचा लाभ मिळतो.

महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती सारखी एक लढाऊ संघटना महाराष्ट्रात लाखो कलावंतांच्या न्याय हक्कासाठी लढत असेल तर अशा संघटनेचे सभासद होऊन कलावंत-साहित्यिक-कीर्तनकार अशा सर्व स्तरातील कलावंतांनी संघटित होणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले. (Narhari Zirwal need of hour for artists to organize themselves nashik news)

इंदिरानगर नाशिक येथील स्वर्णिमा सांस्कृतिक सभागृहात रविवारी (ता. २) राज्यव्यापी कलावंतांची एकमेव संघटना महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती संघटनेतर्फे महाराष्ट्रात प्रथमच महिला कलावंत सन्मान सोहळा घेण्यात आला.

या वेळी पुणे, मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आदी जिल्ह्यातील नामवंत महिला कलावंतांना राज्यस्तरीय महिला भूषण पुरस्कार नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेच्या कायदेशीर सल्लागार ॲड. अनिता जगताप होत्या. तर स्वागताध्यक्ष म्हणून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गायक सोमनाथ गायकवाड हे होते.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

समाज कल्याण वसतिगृह व्यवस्थापक शुभांगी भालेराव, संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश जाधव, प्रदेश संघटक भाऊसाहेब चव्हाण, जिल्हा कार्याध्यक्ष सरपंच दत्तात्रय तांबे, शांताराम दुसाने, धोंडिराम थैल आदींनी कलावंत - साहित्यिक - वारकऱ्यांच्या व्यथा समस्या व अडीअडचणी मांडल्या.

सूत्रसंचालन कवयित्री डॉ. अंजना भंडारी यांनी तर आभार संघटनेचे सचिव कवी भाऊ केदारे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी बाळासाहेब चौधरी, राजू जाधव, बाळासाहेब अस्वले, निर्माता अमितकुमार बडगुजर, कवयित्री सुनीता वाळुंज, शिल्पा झारेकर, दीपाली विसपुते, दिलीप शार्दूल आदींनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st Test Live: KL Rahul ने शतकानंतर का वाजवली शिट्टी? या नव्या सेलिब्रेशनमागचं नेमकं कारण काय?

Video : राजेशच राकेश असल्याचं सत्य ईश्वरीसमोर उघड ! प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले "आता तरी तिला अक्कल येऊ दे"

IND vs WI 1st Test Live: अरे आताच फिफ्टी झाली होती, कशाला घाई केली! Shubman Gill चा चुकीचा फटका अन् विंडीजला मिळाली विकेट

Dmart Offers : दसरा स्पेशल! डीमार्टमध्ये 'या' वस्तू मिळतायत जास्त स्वस्त, पुढचे 4 दिवस डिस्काउंट ऑफर, पाहा एका क्लिकवर..

OBC Scholarship Schemes : १०वी, १२वीच्या ओबीसी विद्यार्थ्यांना मिळते शासनाची शिष्यवृत्ती, सरकारच्या 'या' ८ योजना जाणून घ्या....

SCROLL FOR NEXT