school students experiment esakal
नाशिक

नारोशंकराची घंटा : पिशवीतली प्रयोगशाळा

सकाळ वृत्तसेवा

बोर्डाच्या परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही फार टेन्शन आलेलं असतं. लेखी परीक्षा सुरू होण्यापूर्वी तोंडी परीक्षा, सराव परीक्षा आणि राहिलं साहिलं विज्ञानाचे प्रयोगही विद्यार्थ्यांना करावे लागतात. प्रयोग सादर करण्यासाठी शाळेत प्रयोगशाळा असली तर बरे, नाहीतर बाहेरून साहित्य आयात करावे लागते. (naroshankarachi ghanta Laboratory in Bag nashik news)

अशाच एका शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रयोग सादर करण्याची सूचना तेथील मुख्याध्यापकांनी केली. मुख्याध्यापक शाळेत नवीन असल्यामुळे त्यांनी विज्ञान विषयाच्या शिक्षकांना प्रयोग मांडण्याची सूचना केली.

विज्ञानचे शिक्षकही फार प्रयोगशील असल्यामुळे ते लागलीच दुसऱ्या शाळेतून साहित्य घेवुन येतात. पण येण्यासाठी त्यांना थोडा उशीर होतो. इकडे मुख्याध्यापक त्यांची वाट बघत असतात. बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर हे महोदय शाळेत अवतरतात.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

चिडलेले मुख्याध्यापक या शिक्षकांला दरडावून विचारणा करतात, इतका वेळ लागतो का सर? आता आलेच आहात तर प्रयोगशाळेचे साहित्य कुठे आहे? मुख्याध्यापकांचा रुद्रावतार बघून निरागस चेहऱ्याचे हे शिक्षक त्यांच्या हातातील पिशवी उघडी करून दाखवतात.

त्यातील प्रयोगाचे साहित्य बघताच मुख्याध्यापक आपल्या कपाळावर हात मारुन घेतात. या पिशवीतून आता ‘संशोधन’ होते, हे विद्यार्थ्यांनाच ठाऊक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: उद्धव ठाकरेंचा दिल्लीतून सत्ताबदलाचा नारा! 'सीजेपी'च्या आंदोलनाला दिली भेट, दीपकेंचं केलं कौतुक

Supreme Court: 'अपार आयडी'ला सुप्रीम कोर्टाचा रेड सिग्नल! 26 कोटी विद्यार्थ्यांचा प्रश्न; कोर्टाचा मोठा निर्णय

Rahul Gandhi Protest: राहुल गांधींची तीन तासांनंतर सुटका; बाहेर आल्यानंतर प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया...

Marathi Culture: डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या साहित्यिक वारशाचा गौरव; ‘संस्कृती-संशोधन केंद्रा’त चार पुस्तकांचे प्रकाशन

Ambad Highway Chaos: अंबडमध्ये महामार्गावर मोकाट जनावरांचा धुमाकूळ; वाहतुकीला अडथळा, नागरिकांचा जीव मुठीत

SCROLL FOR NEXT