Raddi Paper esakal
नाशिक

नारोशंकराची घंटा : अहो, रद्दी फक्‍त एक किलो आहे..!

सकाळ वृत्तसेवा

नफेखोरीसाठी काही व्‍यावसायिकांकडून स्‍तर सोडून वेगवेगळे प्रयोग केले जातात. अशाच एका घटनेतून गमतीशीर किस्सा घडला. झाले असे, तपोवन परिसरातील मोठ्या रद्दी स्‍वीकारणाऱ्या व्‍यावसायिकाकडे एक ग्राहक रद्दी विक्रीसाठी आला. (naroshankarachi ghanta raddi paper comedy tragedy sakal special nashik news)

साहजिकच पिशवीतून रद्दी आल्‍याने वजनदार पिशवी थेट वजन काट्यावर ठेवली. कर्मचाऱ्याने पिशवीचे वजन टिपत चिठ्ठीही तयार केली. यानंतर ग्राहकाने ढिगाऱ्यात रद्दी टाकताना पिशवी रिकामी केली. इतक्‍यात मालक धावून आला.

‘अहो, पिशवी काढून वजन करायचे होते ना! आता एकूण वजनातून एक किलो कमी करावे लागतील’ ग्राहकाने क्षणार्धात पिशवी काट्यावर ठेवत, ‘दाखवा बरं एक किलो वजन’, अशी विचारणा केली, असे थोडी कळते म्‍हणत व्‍यापारी निसटायचा प्रयत्‍न करू लागला.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

ग्राहकानेही धीर सोडला नाही अन् म्‍हणाला ‘हातात पिशवी धरा, एक किलो वजन वाटते का?,’ व्यापाऱ्याने काढता पाय घेत रोखपालास एक किलोचे पैसे कमी करून उर्वरित रक्‍कम देण्याची सूचना करून व्‍यापारी पुन्‍हा आपल्‍या केबिनमध्ये परतला.

यावर संतापलेला ग्राहक म्‍हणाला, ‘अहो शेट, रद्दी फक्‍त एक किलो आहे आणि पिशवीचे वजन १९ किलो आहे. तर एकच किलो रद्दीचे पैसे द्या. बस, की अजून काही हवंय’ रागातील स्‍थितीतही ग्राहकाकडून निघालेल्‍या या वक्‍तव्‍यांमुळे रोखपालासह उपस्‍थित कर्मचाऱ्यांनाही हसू आवरले नाही अन् तणावाचे वातावरण काहीसे अल्हाददायक झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Road Accidents Reduction : २०३० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी होणार? ; राज्यसभेत गडकरींनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

Pune Mumbai Expressway Traffic : द्रुतगती मार्गावरील अपघाताचा फटका; पुणे-बंगळूर महामार्गावर अवजड वाहतूक ठप्प

T20 World Cup: इशान किशनच ओपनर! सूर्याचा विश्वास पठ्ठ्याने सार्थ ठरवला, 7 Six अन् फिफ्टी; संजूचे स्थान धोक्यात

Pune Crime : मैत्रिणीला फोन केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला

Jan Arogya Yojana : राज्‍यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्‍य केंद्रातही महात्‍मा फुले योजना; आता बाह्यरुग्ण विभागातील उपचारही मिळतील मोफत

SCROLL FOR NEXT